Vijay Hazare Trophy 2021: दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन (Delhi District Cricket Association) येत्या 7 मार्चपासून भारतात सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy), या राष्ट्रीय वनडे चॅम्पियनशिपच्या बाद फेरीच्या सामन्यांचे आयोजन करणार असल्याचं निश्चित झालं आहे. विजय हजारे ट्रॉफीचा अखेरचा ग्रुप लीग सामना 2 मार्च रोजी संपुष्टात येईल. अरुण जेटली स्टेडियम (Arun Jaitley Stadium) व पालम मैदानात (The Palam Ground) 7 ते 14 मार्च दरम्यान बाद फेरीचे सामने रंगणार असतील. "कृपया लक्षात घ्या की विजय हजारे ट्रॉफी 2020-21 चा बाद फेरीचा टप्पा 7 मार्चपासून नवी दिल्ली येथे खेळला जाईल," बीसीसीआयच्या सचिवांच्या कार्यालयाकडून 25 फेब्रुवारीला सर्व संबंधित राज्य घटकांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. सध्या, स्पर्धेचा लीग स्टेज देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी जैव-सुरक्षित बबलमध्ये खेळले जात आहे. संघांना पाच एलिट गट आणि एक प्लेट गटात विभागले गेले आहे. (Vijay Hazare Trophy 2021: मुंबई कर्णधार Prithvi Shaw याचा रेकॉर्ड-ब्रेक डबल धमाका, पांडिचेरीविरुद्ध द्विशतकासह '200 धावांच्या क्लब'मध्ये मिळवले स्थान)
बीसीसीआयच्या वेबसाइटनुसार प्री-क्वार्टर फायनल (एलिमिनेटर) 7 मार्चला तर उपांत्यपूर्व फायनल 8 मार्च आणि 9 मार्च रोजी खेळला जाईल. दोन सेमीफायनल सामने 11 मार्च रोजी खेळवले जातील तर फायनल 14 मार्च रोजी आयोजित केली जाईल. राष्ट्रीय टी-20, सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेनंतर बीसीसीआयने 2020-21 घरगुती मोसमातील ही दुसरी घरेलू स्पर्धा आयोजित केली आहे. दरम्यान, विजय हजारे ट्रॉफी 2021 च्या एलिट ग्रुप अ पॉइंट टेबलमध्ये गुजरात आणि बडोदा संघाने 16 गुणांसह पहिल्या दोन स्थानांवर कब्जा केला. दोन्ही संघात रविवारी सामना रंगणार आहे. शुक्रवारी तामिळनाडूविरुद्ध पराभव पत्करावा लागला तरी झारखंडला अद्याप एलिट ग्रुप बीच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पंजाब, तामिळनाडू, आंध्र आणि मध्य प्रदेशचे प्रत्येकी आठ गुण आहेत. एलिट ग्रुप सीमध्ये कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि केरळ या तीनही संघाने प्रत्येकी तीन जिंकले आणि 1 सामना गमावला आहे.
दुसरीकडे, स्पर्धेच्या सातव्या दिवसानंतर देवदत्त पडिक्क्लने सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. कर्नाटकच्या युवा फलंदाजाने खेळलेल्या चार सामन्यात एकूण 427 धावा केल्या आहेत. क्रुणाल पांड्या 386 धावा करत दुसर्या स्थानावर आहे. पृथ्वी शॉ सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसर्या स्थानावर घसरला आहे. मुंबईच्या सलामी फलंदाजाने अवघ्या तीन संयत 366 धावा फटकावल्या आहेत.