मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा आणि त्याच्या नवीन सोशल मीडिया मॅनेजरच्या शेअर केलेल्या फोटोवर Netizens फिदा
रोहित शर्मा मुलगी समायरासमवेत (Photo Credits: Twitter|@mipaltan)

भारतीय सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) पोटरीच्या दुखापतीतून बाहेर पडला असला तरी इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या आगामी हंगामासाठी फलंदाज वेळेवर पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. रोहितला न्यूझीलंडविरुद्ध आगामी कसोटी मालिकेतून आधीच बाहेर केल्याने अखेर मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) कर्णधाराला त्याच्या कुटूंबासमवेत काही वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे आणि 'हिटमॅन' या वेळेचा चांगला फायदा करून घेत आहे. प्रत्येक वडिलाप्रमाणेच रोहितलासुद्धा आपली मुलगी समायरा (Samaira) च्या संगतीत राहायाला आवडते. तो सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतो आणि येत्या काही दिवसांत त्याने आपल्या कुटुंबासोबत फोटो शेअर करत राहतो. आयपीएलच्या सुरुवाती आधी मुंबई इंडियन्सने रोहितच्या नवीन सोशल मीडिया मॅनेजरची चाहत्यांशी ओळख करून दिली. (IPL 2020 Schedule of Mumbai Indians: चेन्नई सुपर किंग्स सोबतच्या पहिल्या सामन्यासह जाणून घ्या मुंबई इंडियन्स आयपीएल संघाचे संपूर्ण वेळापत्रक)

आयपीएल (IPL) सुरू होण्यापूर्वी आयपीएल फ्रँचायझीही सक्रिय झाल्या आहेत. सोशल मीडियावर यूजर्सची व्यस्तता वाढवण्यासाठी टीम्स मजेदार ट्विट करत आहेत. या दरम्यान मुंबई इंडियन्सने रोहित आणि त्याची मुलगी समायराचा फोटो शेअर केला. फोटो शेअर करत शेअर करत मुंबई इंडियन्सने कॅप्शन दिले- रोहितची नवीन सोशल मीडिया मॅनेजर किती गोंडस आहेत? आपण 1 ते 10 दरम्यान क्रमांक द्या. मुंबई इंडियन्सची ही पोस्ट चाहत्यांनाही पसंत पडली असून, यावर यूजर्स मजेदार प्रतिक्रियाही पोस्ट करत आहेत. रोहितची पत्नी रितिकानेही फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, "सॅमी आपल्या वडिलांना आपली फोटो शेअर करण्याचा सल्ला देत आहे." पाहा:

रोहित आणि समायराच्या फोटोवर यूजर्सच्या प्रतिक्रिया पाहा

अगदी वडीलांप्रमाणे

10 पैकी45

नवीन सोशल मीडिया मॅनेजरसाठी 200

10 पैकी 264

एक सुंदर नातं

आयपीएल 2020 चा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रोहितच्या मुंबई इंडियन्स आणि महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. मुंबई इंडियन्सने सर्वाधिक वेळा 4 आणि चेन्नई टीमने 3 वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहेत.