ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी (Photo Credit: Getty)

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी (Tom Moody) यांनी जगातील सर्वोत्कृष्ट टी-20 इलेव्हनची निवड केली. यामध्ये त्यांनी 4 भारतीय खेळाडूंची निवड केली. सुरुवातीला त्याने डेविड वॉर्नर (David Warner) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांची सलामी जोडी म्हणून निवड केली. 2013 पासून रोहित आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चे नेतृत्व करीत आहे आणि त्याच्या नेतृत्वात मुंबईने आयपीएलचे चार विजेतेपदं जिंकली आहेत. दुसरीकडे वॉर्नर टी-20 स्पर्धेत परदेशी खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तिसर्‍या क्रमांकावर मूडी यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार आणि आयपीएलमधील सर्वकालिक सर्वोच्च धावा करणाऱ्या विराट कोहलीला (Virat Kohli) निवडले. विराट आणि रोहितमध्ये टीम इंडियाच्या 'हिटमॅन'ला संघाचा कर्णधार म्हणून नेमले. कोहलीचा आरसीबी सहकारी एबी डिव्हिलियर्सला मूडीने चौथ्या स्थानावर ठेवले. (ICC टूर्नामेंट्सची बाद फेरी गाठण्यात टीम इंडिया अयशस्वी का? इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी कारण केलं स्पष्ट)

मूडीने Cricbuzzवर हर्षा भोगले यांच्याशी लाईव्ह चॅट दरम्यान वर्ल्ड टी -20 इलेव्हनची निवड केली. यष्टीरक्षक म्हणून मूडी यांनी निकोलस पूरनला निवडले कारण त्यांना अकरामध्ये डाव्या हाताच्या फलंदाजांची गरज भासली. तसेच पूरनबरोबर कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये (सीपीएल) काम केल्यामुळे, मूडीला पूरनच्या क्षमतेबद्दल माहित आहे. याचा अर्थ असा होतो की मूडीने महेंद्र सिंह धोनीला आपल्या वर्ल्ड टी -20 इलेव्हनमधून वगळले. अष्टपैलू म्हणून त्याने कोलकाता नाईट रायडर्स’च्या आंद्रे रसेलला निवडले. तज्ज्ञ फिरकी गोलंदाजांसाठी मूडी यांनी सुनील नरेन आणि राशिद खानला इलेव्हनमध्ये स्थान दिले. त्यानंतर वेगवान गोलंदाज म्हणून त्यांनी मिशेल स्टार्क, जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह यांना निवडले. 12 वा खेळाडू म्हणून मूडीने रवींद्र जडेजाला क्षेत्ररक्षणातील योग्यतेमुळे निवडले.

टॉम मूडीज वर्ल्ड टी -20 इलेव्हन येथे पाहा:

डेविड वॉर्नर, रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिशेल स्टार्क, रशीद खान, जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर आणि रवींद्र जडेजा (12 वा खेळाडू).