ICC टूर्नामेंट्सची बाद फेरी गाठण्यात टीम इंडिया अयशस्वी का? इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी कारण केलं स्पष्ट
Team India (Photo Credits: Twitter/BCCI)

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) मोठे यश मिळवले आहे. कोहलीने 2018/19 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत विजय मिळवून दिला.कोहलीच्या नेतृत्वात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमारसारखे वेगवान गोलंदाज सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानले जातात. पण एक गोष्ट म्हणजे कर्णधार म्हणून या क्षणी कोहलीला अद्याप एक गोष्ट मिळवत आलेली नाही आणि ती म्हणजे आयसीसीची (ICC) ट्रॉफी. टीम इंडियाला 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एकही आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. त्या स्पर्धेनंतर झालेल्या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये भारताला बाद फेरीत गाशा गुंडाळावा लागला आहे. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये भारताच्या पदरी निराशा आली? याचं कारण इंग्लंडचा माजी कर्णधार आणि क्रिकेट जाणकार नासिर हुसेन (Nasser Hussain) यांनी सांगितलं. (सचिन तेंडुलकर, विराट कोहली की रोहित शर्मा... कोण आहे मर्यादित षटकांमधील सर्वोत्तम फलंदाज, अवघड प्रश्नाचे 'रणजी किंग' वसीम जाफरने दिले उत्तर)

“आयसीसी टूर्नामेंट्ससाठी केली जाणारी खेळाडूंची निवड आणि परदेशातील परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता यात भारतीय संघ कमी पडतो आहे. हे फक्त एक गेम प्लॅन ठेवण्याबद्दल नाही,” इंग्लंडचे माजी कर्णधार नासेर यांनी स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट कनेक्ट’ कार्यक्रमात सांगितले. हुसेन पुढे म्हणाले की, भारताची अव्वल फळीतील फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली धावा धावा करून विजय मिळवत असल्याने अवघड परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी भारताची मधली फळी परीक्षित आहे.

“जर परिस्थिती बळकट असेल आणि तुम्ही विश्वचषक सेमीफायनल खेळत आहात. विराट आणि रोहित बाद झाल्यावर तुमच्या संघाची स्थिती 20-2 होते त्यावेळी तुमचे मधल्या फळीतील गोलंदाज कुठे आहेत?”, असं हुसेन म्हणाले. 2013 नंतर टीम इंडियाने 2015, टी-20 2016 आणि 2019 वर्ल्ड कपची सेमीफायनल फेरी गाठली आहे आणि2014 आयसीसी वर्ल्ड टी-20 व चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 असे दोन अंतिम फेरी गाठली. बहुतेक प्रसंगी टूर्नामेंट प्री-फेवरेट असूनही, बाद फेरीच्या सामन्यांत भारतीय संघ आपली पुन्हालय शोधण्यात अपयशी ठरला आहे.