Ashes 2021-22 Series: अॅशेस मालिका (Ashes Series) संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंडच्या (England) खेळाडूंनी होबार्टमधील हॉटेलमध्ये रात्रभर पार्टी केली आणि गोंधळ घातला. माहितीनुसार, यामुळे पोलिसांना बोलवावे लागले. फॉक्स स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार या पार्टीत इंग्लंड कर्णधार जो रूट (Joe Root) आणि वेगवान गोलंडाज जेम्स अँडरसन (James Anderson) यांच्याशिवाय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अॅलेक्स कॅरी, ट्रॅव्हिस हेड आणि नॅथन लायन (Nathan Lyon) यांचा समावेश होता. पोलिस तेथे आल्यावर त्यांची अॅशेस पार्टी बंद करण्यात आली होती. त्याचा एक व्हिडिओ इंटरनेट मीडियावर व्हायरल होत आहे. हे सर्व खेळाडू होबार्टमधील (Hobart) हॉटेलच्या छतावर बसून बिअर पीत होते, तेव्हा पोलिसांनी दरवाजा ठोठावला आणि या सर्वांना त्यांच्या खोलीत जाण्यास सांगितले. या सर्वांचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये काही खेळाडू कसोटी किटमध्ये म्हणजे पांढरे कपडे तर काही सराव किट परिधान केलेले दिसत आहेत. (Ashes 2021-22: कर्णधार असावा तर असा! पॅट कमिन्सने उस्मान ख्वाजासाठी थांबवले ऑस्ट्रेलियाचे विजयी सेलिब्रेशन, व्हिडिओ पाहून कराल सलाम)
डेली टेलिग्राफच्या वृत्तानुसार, या सर्वांना पोलिसांनी सोमवारी सकाळी आवाजाच्या तक्रारी मिळाल्याने पकडले. चार पोलीस अधिकारी येऊन या खेळाडूंशी बोलले. व्हिडिओमध्ये हे खेळाडू हॉटेलच्या छतावर बसल्याचे दिसत आहे. अॅशेस मालिकेतील शेवटचा कसोटी सामना होबार्टमध्येच खेळला गेला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 146 धावांनी विजय मिळवला आणि 4-0 अशी मालिका काबीज केली. पोलिसांनी सांगितल्यानंतर खेळाडू सरळ उठून निघून गेले. व्हिडिओमध्ये लायनला “काही हरकत नाही” असे म्हणताना ऐकू येत आहे. डेली टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियालाही या व्हिडिओची माहिती आहे. यावरून असे दिसून येते की रविवारी अॅशेस मालिका संपल्यानंतर सेलिब्रेट करण्यासाठी क्रिकेटपटू रात्रभर जागे होते.
The first and last time #Hobart will host an #Ashes test… ‘Bit too loud’ .. Awesome pic.twitter.com/zdZ4dmcsf6
— Matt de Groot (@mattdegroot_) January 18, 2022
दरम्यान दोन्ही संघातील पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 4-0 असा पराभव केला. या मालिकेत इंग्लंड संघाचा दारुण पराभव झाला होता. इंग्लंडचा संघ एकही सामना जिंकू शकला नाही, तर चौथा कसोटी सामना अनिर्णित करण्यात यशस्वी झाले होते. पण याशिवाय त्यांना या मालिकेत ऑस्ट्रेलियाला झुंज देता आली नाही. त्याच्या फलंदाजीने संघाची सर्वाधिक निराशा केली. या मालिकेनंतर कर्णधार रूट आणि प्रशिक्षक क्रिस सिल्व्हरवुड यांच्यावरही जोरदार टीका होत आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी या दोघांना काढून टाकण्याचे मत प्रदर्शित केले आहे.