अॅशेस मालिकेत (Ashes Series) ऑस्ट्रेलियन संघाने चमकदार कामगिरी करत इंग्लंडचा 4-0 ने धुव्वा उडवला. होबार्टमध्ये (Hobart) झालेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात देखील यजमानांनी 146 धावांनी मोठा विजय मिळवला. 271 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा (England) संघ दुसऱ्या डावात अवघ्या 124 धावांत आटोपला आणि त्यांचा अॅशेस दौऱ्याचा लाजिरवाणा अंत केला. अॅशेस जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन (Australia) संघाने ट्रॉफी मिळताच खूप सेलिब्रेशन केले, पण यादरम्यान त्याचा कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) सेलिब्रेशन दरम्यान असे काही केले, ज्यानंतर प्रत्येक क्रिकेट चाहते त्याला सलाम करत आहेत. कमिन्सने मुस्लिम संघ सहकारी उस्मान ख्वाजासाठी (Usman Khawaja) अॅशेस विजयाचे सेलिब्रेशन थांबवले. पण अखेर असे काय घडले की ऑस्ट्रेलियन कर्णधाराने असे केले? (AUS Vs ENG Ashes Series: ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर 4-0 ने विजय, 146 धावांनी सामना घातला खिशात)
जेव्हा ऑसीज त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांवर जबरदस्त विजय साजरा करत होते तेव्हा खेळाडू शॅम्पेनची बाटली उघडण्यास तयार होते. तथापि, उस्मान ख्वाजा हा मुस्लिम आहे आणि त्याचा धर्म त्याला शॅम्पेन पिण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे तो या विजयी उत्सवापासून दूर राहत होता. पण नंतर, कमिन्सने ख्वाजाला आधी येऊन फोटोसाठी पोझ देण्यास सांगितले व अन्य खेळाडूंना ‘शॅम्पेन’ उत्सव थांबवण्यास सांगितले. “हा एक छोटासा हावभाव असू शकतो परंतु यामुळे पॅट कमिन्स महान बनतो. त्याला जाणवले की ख्वाजा बाहेर पडला आहे आणि ते दुरुस्त केले,” कमिन्सचे अद्भुत हावभाव दर्शविणारे ट्विटमध्ये लिहिले. कमिन्सचे हे जेस्चर सध्या क्रिकेट चाहत्यांमध्ये जोरदार व्हायरल होत आहे.
This might be a small gesture but this is what makes Pat Cummins great. He realised Khawaja had to dip because of the booze and rectifies it. pic.twitter.com/GNVsPGJhfK
— Fux League (@buttsey888) January 16, 2022
ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंड संघाविरुद्ध पाचव्या अॅशेस कसोटीत वर्चस्वपूर्ण कामगिरी केली आणि होबार्टच्या बेलेरिव्ह ओव्हल येथे तीन दिवसांत प्रतिस्पर्ध्यांचा 146 धावांच्या फरकाने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या पहिल्या डावात एकूण 303 धावा केल्या. तर प्रत्युत्तरात इंग्लंड एकूण 188 धावाच करू शकला. त्यांनतर ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 155 धावांत गुंडाळून जो रूटच्या संघाला विजयासाठी 271 धावांचे लक्ष्य मिळाले. रोरी बर्न्स आणि झॅक क्रॉली यांनी सलामीसाठी 68 धावांची भागीदारी करून इंग्लंडची चांगली सुरुवात करून दिली. मात्र, त्यानंतर इंग्लंडची फलंदाजी पुन्हा एकदा कोलमडली. आणि संघाने अवघ्या 56 धावांत त्यांच्या पुढील 9 विकेट गमावल्या.