केएल राहुल (Photo Credit: IANS)

आगामी इंडियन प्रीमियर लीगसाठी (Indian Premier League) किंग्ज इलेव्हन पंजाबने ((Kings XI Punjab) कर्णधारपदी भारतीय फलंदाज केएल राहुल (KL Rahul) याची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. 2018 मध्ये किंग्स इलेव्हन संघात सामील होणारा राहुल फ्रँचायसीसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. पंजाब फ्रँचायसीसाठी 8 एप्रिल, 2018 रोजी केएल राहुलने पहिला सामना खेळला. राहुलने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध (आता दिल्ली कॅपिटल्स) तुफानी डाव खेळला आणि आयपीएलच्या इतिहासात आपले नाव नोंदवले. राहुलने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक ठोकले आणि आपल्या आगमन जाहीर केले. राहुलचा हा रेकॉर्ड अजूनही कायम आहे आणि हा पराक्रम करून राहुल पूर्ण दोन वर्ष झाली आहेत. राहुलने आजच्याच दिवशी हा पराक्रम केला होता. पीसीएच्या आयएसए बिंद्रा स्टेडियम मोहाली येथे दिल्ली कॅपिटलस विरूद्धच्या सामन्यादरम्यान राहुलने 51 धावांची खेळी केली होती. त्या तुफानी खेळीत केएल राहुलने 4 षटकार आणि 6 चौकार लगावले होते.

ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर राहुलने एक षटकार आणि दोन चौकार मारले. त्यानंतर गोलंदाजीला आलेल्या अमित मिश्राला त्याने 3 चौकार आणि 2 षटकार ठोकले. त्यानंतर राहुलने अवघ्या 14 चेंडूत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केले. राहुलच्या त्या तुफानी डावाची झलक पाहा:

राहुलने असा तुफान डाव खेळण्याची ही पहिली वेळ नव्हती. या खेळीनंतर राहुल किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य बनला. या अर्धशतकी डावासह राहुलने युसूफ पठाण आणि सुनील नरेनचा रेकॉर्ड मोडला होता. यूसुफने आणि सुनील नरेननेही या लीगमध्ये अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावले. दुसरीकडे, सुरेश रैनाने 16 आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. राहुलच्या नेतृत्वात किंग्ज इलेव्हन पंजाब 30 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएलची मोहीम सुरु करणार होती. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अलीकडेच कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या संकटामुळे बहुप्रतिक्षित हंगाम पुढे ढकलला.