इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16 व्या मोसमात आज पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स (PBKS vs GT) आमनेसामने आहे. पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील हा सामना पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. या मोसमात दोन्ही संघ आतापर्यंत प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत. त्यांना दोन सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएलच्या आकडेवारीनुसार पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनने विजेत्या संघांसाठी 3887 धावा केल्या आहेत. या यादीत पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन पहिल्या स्थानावर कायम आहे. येथे संपूर्ण यादी पहा...(हे देखील वाचा: IPL 2023, Orange And Purple Cap: ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण आहे पुढे ते जाणून घ्या, ईथे पहा संपूर्ण यादी)
या फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत
शिखर धवन
आयपीएलच्या इतिहासात टीम इंडियाचा दिग्गज सलामीवीर शिखर धवन पंजाब किंग्ज व्यतिरिक्त मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आहे. शिखर धवनने विजयी संघांसाठी 3887 धावा केल्या आहेत. या यादीत शिखर धवन पहिल्या स्थानावर कायम आहे.
रोहित शर्मा
त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. आयपीएलच्या इतिहासात रोहित शर्माने विजयी संघासाठी आतापर्यंत एकूण 3641 धावा केल्या आहेत. मंगळवारी झालेल्या सामन्यात रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 45 चेंडूत 65 धावा केल्या.
सुरेश रैना
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्जचा माजी स्फोटक फलंदाज सुरेश रैना आहे, जो मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जातो. सुरेश रैनाच्या आयपीएल इतिहासात 3559 धावा आहेत.
विराट कोहली
या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. विजयी संघाकडून खेळताना विराट कोहलीने 3541 धावा केल्या आहेत. विराट कोहली 2008 पासून आरसीबी संघाचा भाग आहे.
डेव्हिड वॉर्नर
या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या नावाचाही समावेश आहे. यावेळी डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे आणि ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्लीचे कर्णधारपद सांभाळत आहे. या यादीत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर पाचव्या स्थानावर कायम आहे. डेव्हिड वॉर्नरने विजयी संघासाठी आतापर्यंत एकूण 3502 धावा केल्या आहेत.