5 ऑक्टोबरपासून होणार्या क्रिकेटच्या सर्वात मोठ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी (ICC ODI World Cup 2023) 10 संघ अंतिम करण्यात आले आहेत. पात्रता फेरीत, नेदरलँड्सने स्कॉटलंडचा 4 विकेट्सने (NED vs SCO) पराभव करून दणदणीत अव्वल 10 मध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी, झिम्बाब्वेला पराभूत करून स्कॉटलंडने अव्वल दहामध्ये आपली दावेदारी भक्कम केली होती, मात्र नेदरलँड्सने अप्रतिम खेळ दाखवत स्कॉटलंडचे स्वप्न 4 विकेट्स राखून जिंकताच भंग पावले.
नेदरलँडचा संघ पाचव्यांदा विश्वचषक खेळणार
नेदरलँडचा संघ पाचव्यांदा एकदिवसीय विश्वचषक खेळणार आहे. यापूर्वी हा संघ 1996, 2003, 2007 आणि 2011 मध्ये विश्वचषक खेळला आहे. (हे देखील वाचा: MS Dhoni Birthday Special: एमएस धोनी आज झाला 42 वर्षांचा, पहा माहीचे मोठे रेकॉर्ड जे मोडणे आहे कठीण)
टीम इंडियाचे वनडे विश्वचषक 2023 चे वेळापत्रक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: 08 ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान: 11 ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान: 15 ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश: 19 ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड: 22 ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड: 29 ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध श्रीलंका: 02 नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: 05 नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध नेदरलँड्स: 11 नोव्हेंबर, बेंगळुरू