Australia Men's National Cricket Team vs India National Cricket Team, Border-Gavaskar Trophy 2024-25: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) 5 सामन्यांचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Boder-Gavaskar Trophy 2024-25) दुसरा सामना आजपासून म्हणजेच शुक्रवार, 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये (Adelaide Oval, Adelaide) खेळवला जाणार आहे. हा पिंक बाॅल कसोटी सामना असेल. टीम इंडियाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. यासह पाहुण्या संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता टीम इंडिया दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेतील आघाडी दुप्पट करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला ॲडलेड कसोटी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक कसोटी सामना पाहायला मिळणार आहे.
जुन्या जखमा विसरून नवी सुरुवात करावी लागणार
खरं तर, भारताने मागच्या वेळी येथे खेळला होता तेव्हा संपूर्ण संघ 36 धावांत गारद झाला होता. या जुन्या जखमा विसरून नवी सुरुवात करण्यावर भारताची नजर असेल. टीम इंडियासाठी आनंदाची बातमी म्हणजे कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन निश्चित आहे. अशा स्थितीत भारतीय संघाची फलंदाजी अतिशय मजबूत दिसत आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक सकाळी 9 वाजता होईल.
Lights, Pink Ball, Action. 🏏 Will Australia settle the score? 👀 pic.twitter.com/aMk7d24zIZ
— Disney+ Hotstar (@DisneyPlusHS) December 5, 2024
कुठे पाहणार सामना
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स चॅनलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय, Disney+ Hotstar ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. याशिवाय त्याचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवरही उपलब्ध असेल.
भारताची संभाव्य प्लेइंग 11
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, आर अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11
उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड