Team India (Photo Credit - Twitter)

वर्ल्ड कप 2023 चे वेळापत्रक (World Cup 2023) मंगळवारी जाहीर करण्यात आले. यावेळी 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला (Team India) चार देशांविरुद्ध मालिका खेळायची आहे. या मालिकेत आयर्लंडच्या (Ireland) नावाचाही समावेश आहे. टीम इंडिया जुलैमध्ये वेस्ट इंडिजचा दौरा (West Indies Tour) करणार असून त्यानंतर ऑगस्टमध्ये आयर्लंडचा दौरा करणार आहे. टीम इंडियाला आयर्लंडमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक आले आहे. वृत्तानुसार, टीम इंडिया आणि आयर्लंड यांच्यातील मालिकेतील पहिला टी-20 सामना 18 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. (हे देखील वाचा: IND vs WI Series 2023: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, 'या' प्रकरणात ख्रिस गेलला टाकू शकतो मागे)

एकदिवसीय विश्वचषकापूर्वी टीम इंडिया जवळपास चार मालिका खेळणार आहे. टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा 12 जुलैपासून सुरू होणार आहे. कसोटी मालिकेसाठी निवडलेले खेळाडू दोन गटात वेस्ट इंडिजला पोहोचतील, काही खेळाडू 29 जूनला रवाना होतील, तर काही खेळाडू 30 जूनला पोहोचतील.

ही मालिका जवळपास महिनाभर चालणार आहे. ही मालिका ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून याच महिन्यात टीम इंडियाला आयर्लंडचा दौराही करायचा आहे. तेथे तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या टी-20 मालिकेत टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते आणि असे मानले जात आहे की हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडू यात आपले कौशल्य दाखवताना दिसतील.

एकदिवसीय विश्वचषकापर्यंत टीम इंडियाचे वेळापत्रक खूपच व्यस्त 

आशिया कप 2023 आयर्लंड मालिकेनंतर सुरू होईल. यंदाच्या आशिया चषकाचे संपूर्ण वेळापत्रक अद्याप समोर आलेले नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वर्षी 31 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 17 सप्टेंबरपर्यंत चालेल. यानंतर ऑस्ट्रेलियन संघ सप्टेंबरमध्येच भारत दौऱ्यावर येणार आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सप्टेंबरमध्ये खेळवली जाणार आहे.

विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून होणार सुरू

त्याचबरोबर सप्टेंबरमध्येच टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेसाठीही तयारी सुरू आहे. सप्टेंबर संपताच विश्वचषकाचे वातावरण पूर्णपणे तयार होईल. यंदाचा विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर टीम इंडिया 8 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपला सुरुवात करणार आहे.