Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) क्रिकेट संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पण ही पाच सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियासाठी आव्हानात्मक ठरत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं भारतावर  28 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या कसोटीत इग्लंडला नमवण्यासाठी टीम इंडिया सर्वोत्तपरी प्रयत्न करणार असून मात्र यावेळी हे आव्हान जास्त कठीण असणार आहे. (हेही वाचा - IND vs ENG 2nd Test 2024: दुसऱ्या कसोटीतून रवींद्र जाडेजा आणि KL राहुल संघाबाहेर, सरफराज खानला मिळाली संधी )

हे आव्हान कठीण जाणार आहे कारण भारताचे चार महत्त्वाचे खेळाडू या सामन्यात उपस्थित नसणार आहे. टीम इंडियाचा स्टार विराट कोहलीनं मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून वैयक्तिक कारणासाठी त्यानं घेतलेली माघार. तसेच टीम इंडियाचा हुकुमी एक्का मोहम्मद शामीनं दुखापतीमुळे घेतलेली माघार.  स्टार अष्टपैलू रवींद्र जाडेजा आणि केएल राहुल दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाच्या अडचणी खूप वाढल्या आहेत.

संभाव्य टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंगटन सुंदर आणि सौरभ कुमार.