Team India (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: पहिल्या कसोटी सामन्यात नेत्रदीपक विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ उद्या 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर (Green Park, Kanpur) बांगलादेशविरुद्ध दुसरा सामना (IND vs BAN 2nd Test 2024) खेळणार आहे. एका वृत्तानुसार टीम इंडिया दुसऱ्या कसोटीत तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरणार असून चायनामॅन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) प्लेइंग इलेव्हनमध्ये परतणार आहे. वास्तविक, ग्रीन पार्कची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त मानली जाते आणि कानपूर कसोटी जिंकून मालिका क्लीन स्वीप करण्यासाठी टीम इंडिया तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरण्याची योजना आखत आहे. सध्या भारतीय संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.

ग्रीन पार्क हे कुलदीप यादवचे घरचे मैदान

कुलदीप यादवने मार्च 2024 मध्ये धर्माशाला येथे इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्या कसोटीत कुलदीपने शानदार गोलंदाजी करत सात विकेट्स घेतल्या आणि तो सामनावीर ठरला. ग्रीन पार्क हे कुलदीप यादवचे घरचे मैदान असून संघ व्यवस्थापन त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात संधी देण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. (हे देखील वाचा: IND vs BAN 2nd Test Pitch Report: कानपूरच्या खेळपट्टीवर कोण जिंकणार फलंदाज की गोलंदाज? सामन्यापूर्वी येथे जाणून घ्या पिच रिपोर्ट)

मोहम्मद सिराज होऊ शकतो बाहेर

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली आणि काही काळ मैदानाबाहेर जावे लागले. सिराजला पूर्णपणे तंदुरुस्त राहण्याची संधी देऊन संघ व्यवस्थापन त्याला विश्रांती देऊ शकते. सिराजने पहिल्या कसोटी सामन्यात दोन विकेट घेतल्या होत्या.

गेल्या कानपूर कसोटीत भारतीय फिरकीपटूंनी 17 विकेट्स घेतल्या होत्या

भारतीय क्रिकेट संघाने ग्रीन पार्क येथे 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता, जो अनिर्णित राहिला होता. टीम इंडिया हा कसोटी सामना जिंकू शकली नाही. या कसोटीत भारतीय संघ रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल या तीन फिरकी गोलंदाजांसह खेळला. या सामन्यात तीन फिरकीपटूंनी मिळून एकूण 17 विकेट घेतल्या.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप.