![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2024/09/kanpur-pitch.jpg?width=380&height=214)
Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्याची मालिका (IND vs BAN Test Series 2024) खेळवली जात आहे. यांच्यातील पहिला सामना चेन्नई (Chennai) येथे खेळवला गेला. जिथे भारतीय संघाने बांगलादेशवर 280 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचवेळी, मालिकेतील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर (Kanpur Greean Park Stadium) खेळवला जाणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या दृष्टिकोनातूनही हा सामना भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा आहे.
जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल (IND vs BAN 2nd Test Pitch Report)
कानपूर ग्रीन पार्क स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर ग्रीन पार्कची खेळपट्टी काळ्या मातीची आहे. त्यामुळे ही खेळपट्टी साधारणपणे फिरकीपटूंसाठी अनुकूल असणार आहे. या खेळपट्टीवर पहिल्या दोन सत्रात वेगवान गोलंदाजांना आणि शेवटच्या तीन दिवसांत फिरकीपटूंना मदत मिळणार आहे. पहिले दोन दिवस फलंदाजीसाठीही चांगले असतील. तसेत लाल माती वेगवान गोलंदाजांसाठी योग्य असते. पण ही खेळपट्टी संथ आणि कमी उंचीची असणे अपेक्षित आहे.
Head coach Gautam Gambhir and captain Rohit Sharma assessed the Kanpur pitch before the 2nd Test match.#INDvBAN pic.twitter.com/wJcO4wYCfJ
— OneCricket (@OneCricketApp) September 25, 2024
हे देखील वाचा: IND vs BAN 2nd Test 2024: कानपूर कसोटी सामन्याच्या तिकीटविक्रीवर बंदी, धक्कादायक कारण आलं समोर
कानपूर कसोटीसाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
बांगलादेश
शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा.