रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-12 सामन्यांसाठी चार दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. 23 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याने टी-20 वर्ल्ड रोमांचला सुरुवात होणार आहे. युएई आणि ओमान येथे आयोजित केला जाणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) जेतेपदासाठी विराट कोहलीची टीम इंडिया (Team India) सर्वात प्रबळ दावेदार मानली जात आहे. टी-20 विश्वचषक 2021 च्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा (Indian Team) सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. कर्णधार विराट कोहलीने अलीकडेच संकेत दिले की केएल राहुल संपूर्ण स्पर्धेत अनुभवी रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत सलामीला उतरेल. रोहित ज्याने या वर्षी सर्व फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा आहे, त्याने टी-20 WC पूर्वी फॉर्ममध्ये परतण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत आपल्या संपूर्ण लयीत कमबॅक करून ‘हिटमॅन’ रोहित खालील रेकॉर्ड मोडू शकतो. (T20 World Cup 2021, IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ वेगवान गोलंदाजाला मिळणार नाही संधी, माजी दिग्गजने वर्तवला अंदाज)

3,000 टी-20 धावा

विराट कोहली (3,159) आणि मार्टिन गप्टिल (2939) नंतर रोहित सध्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज आहे. त्याने 138.96 स्ट्राइक रेटसह 111 सामन्यांत 32.54 च्या सरासरीने 2,864 धावा आहेत. अशा स्थितीत या फॉरमॅटमध्ये 3,000 धावांचा टप्पा सर कारण्यासाठी त्याला आणखी 136 धावा दूर आहे.

रोहित गुप्टिलला मागे टाकू शकतो

रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत टी-20 मध्ये दुसरे सर्वाधिक 133 षटकार मारले आहेत. तो गप्टिलच्या मागे दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 147 षटकार खेचण्याची कमाल केली आहेत. आणि हिटमनच्या फॉर्मचा विचार करता तो या यादीतील गप्टिलच्या पुढे जाण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.

रोहित विश्वचषकात एक हजार धावा पूर्ण करू शकतो

रोहितने आपला पहिला टी-20 विश्वचषक सामना 2007 मध्ये खेळला. त्याने आतापर्यंत स्पर्धेत 39.58 च्या उल्लेखनीय सरासरीने 673 धावा केल्या आहेत. आणि रोहितला टी-20 विश्वचषकात 1000 धावा करणारा पहिला भारतीय बनण्याची संधी आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा

गेल्या काही वर्षांमध्ये रोहितने टी-20 क्रिकेटमध्ये 31.91 च्या सरासरीने एकूण 9,446 धावा केल्या आहेत. कोहलीनंतर फॉरमॅटमध्ये तो भारताचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. उल्लेखनीय म्हणजे, कोहलीने नुकत्याच संपलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आवृत्तीत हा महत्त्वाचा टप्पा गाठला.