
T20 World Cup 2021: भारतात ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup India) बीसीसीआयला (BCCI) तसेच पाकिस्तान क्रिकेट संघाच्या (Pakistan Cricket Team) व्हिसास मान्यता देण्यात आली आहे, अशी घोषणा बीसीसीआयच्या शुक्रवारी अॅपेक्स कौन्सिलच्या (BCCI Apex Council) बैठकीत करण्यात आली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मनी यांनी पूर्वी सांगितले होते की ते फक्त खेळाडू आणि माध्यमांसाठीच नव्हे तर त्यांच्या चाहत्यांसाठी व्हिसाच्या प्रतीक्षेत आहेत. भारतीय बोर्ड यामध्ये अपयशी ठरल्यास आयसीसीला (ICC) युएईमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यास सांगितले जाईल अशी चेतावणी त्यांनी दिली. मात्र, पाकिस्तानच्या चाहत्यांना व्हिसा देण्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालय निर्णय घेईल अशी माहिती अॅपेक्स कौन्सिलला मिळाली आहे. अलिकडच्या काळात दोन्ही देशांमधील राजकीय संबंधांमध्ये गोंधळ उडाला आहे. शिवाय, पाकिस्तानी चाहते भारतात येऊन टी-20 वर्ल्ड कपचा आनंद घेणे हे सर्व त्यावेळी देशातील कोविड-19 स्थितीवर अवलंबून आहे. भारतात कोविडची प्रकरणे वाढत असल्याने मंत्रालयाकडून चाहत्यांबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता नाही. (2021 ICC T20 World Cup: 'हे' 6 दिग्गज खेळाडू निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे, टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर खेळाला करू शकतात रामराम)
दुसरीकडे, भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी बीसीसीआयने तयारी सुरु केली आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत स्पर्धेच्या ठिकाणांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या स्पर्धेचे आयोजन नऊ शहरांमध्ये होणार असल्याचे बैठकीत ठरले असून अंतिम सामना हैदराबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. याशिवाय दिल्ली, मुंबई, हैदराबाद, धर्मशाला, चेन्नई, बेंगलोर, लखनऊ आणि कोलकाता येथे लीग फेरीचे सामने खेळले जातील. या नऊ ठिकाणी तयारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत तथापि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेपूर्वी अंतिम निर्णय घेतला जाईल. बोर्डाच्या एका सूत्रानुसार कोरोना महामारीच्या संदर्भात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात परिस्थिती कशी असेल याची कल्पना करणे आता शक्य नाही पण तयारी सुरूच ठेवली पाहिजे. महामारी सुरु झाल्यापासून आणि अलीकडेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) व टोकियो ऑलिम्पिक संघटना समितीने ऑलिम्पिक खेळांत परदेशी प्रेक्षकांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे, चर्चा इतर मुद्द्यांवर देखील चर्चा करण्यात आली ज्यामध्ये नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी 2021-22 देशांतर्गत क्रिकेट हंगाम आणि तामिळनाडू, मुंबई, कर्नाटक आणि सौराष्ट्र टी-20 लीगच्या आयोजनाचा समावेश आहे. शिवाय, 2021-22 देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा यापूर्वी घडल्या गेलेल्या वेळापत्रकांनुसार होतील, अंतिम निर्णय देशातील कोविडच्या परिस्थितीनुसार होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.