Surya Kumar Yadav (Photo Credit - Twitter)

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज लखनौ येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या T20 मधील पराभवानंतर टीम इंडियाला (Team India) या सामन्यात मालिका बरोबरीत आणायची आहे. मालिकेत टिकण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल. या सामन्यात विजयासाठी सूर्यकुमार यादवची (Surya Kumar Yadav) फलंदाजी खूप महत्त्वाची आहे. सूर्यकुमार यादवने पहिल्या T20 सामन्यात 47 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने भारताचे माजी खेळाडू एमएस धोनी (MS Dhoni) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांना मागे टाकले आहे. आता दुसऱ्या T20 मध्ये शिखर धवनचा (Shikhar Dhawan) एक विक्रम निशाण्यावर आहे. हा विक्रम मोडण्यासाठी सूर्याला दमदार धावा कराव्या लागतील.

काय आहे तो रेकॉर्ड 

सूर्यकुमार यादवने 44 टी-20 डावांमध्ये 178.76 च्या स्ट्राइक रेटने 1625 धावा केल्या आहेत. सूर्या हा टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू असून त्याच्याकडे एकूण 13 अर्धशतके आणि तीन शतके आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तो पाचव्या स्थानावर आहे. गेल्या सामन्यातच त्याने धोनी आणि रैनाला मागे टाकत हे स्थान मिळवले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो या यादीत चौथ्या क्रमांकावर येऊ शकतो. त्यासाठी त्याला स्फोटक खेळीची गरज आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात त्याने 135 धावा केल्या तर तो या यादीत चौथ्या क्रमांकावर येईल. शिखर धवर सध्या या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने एकूण 1759 धावा केल्या आहेत.

भारतासाठी करो किंवा मरो सामना

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियासाठी करो किंवा मरो अशी परिस्थिती आहे. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकही मालिका गमावलेली नाही, त्यामुळे हार्दिकला आपला हा विक्रम कायम राखायचा आहे. भारताला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांनी आपल्या फलंदाजीचा विचार करणे आवश्यक आहे. टी-20 मध्ये टॉप ऑर्डर सातत्याने अपयशी ठरत आहे. (हे देखील वाचा: IND vs NZ 2nd T20: आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' खेळाडूंकडे)

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

विराट कोहली - 4008

रोहित शर्मा - 3853

केएल राहुल - 2265

शिखर धवन - 1759

सूर्यकुमार यादव - 1625