Ahmedabad Pitch विवादावर Vivian Richards यांनी इंग्लंड खेळाडूंना सुनावलं, म्हणाले- 'चौथ्या सामन्यासाठी अशीच खेळपट्टी असायला हवी'
व्हिव्हियन रिचर्ड्स (Photo Credit: Instagram)

IND vs ENG 4th Test 2021: तिसर्‍या कसोटी सामन्याच्या खेळपट्टीवर आतापर्यंत भरपूर चर्चा झाली आहे, पण वेस्ट इंडीजचे फलंदाज विव्हियन रिचर्ड्स (Vivian Richards) यांना मालिकेच्या शेवटच्या कसोटी सामन्यातही असाच ट्रॅक पाहायला आवडेल असे म्हटले आहे. दोन दिवसात संपुष्टात आलेला पिंक-बॉल टेस्ट (Pink-Ball Test) टीम इंडियाने (Team India) फिरकीपटूंच्या जोरावर एकतर्फी विजय मिळवला. रोहित शर्मा वगळता कोणताही फलंदाज या खेळपट्टीवर टिकून खेळी शकला नाही. फलंदाजांच्या अपयशासाठी समीक्षकांनी या खेळपट्टीला दोष दिला आहे. दुसरीकडे, भारतीय संघाचा (Indian Team) ओपनर रोहित म्हणाला की खेळपट्टीमध्ये कोणताही दोष नव्हता. अगदी कर्णधार विराट कोहलीनेही सांगितले की दोन्ही संघांच्या फलंदाजांनी खराब कामगिरी बजावली होती, त्यामुळे सामना दोन दिवस चालला. फिरकीपटू आर अश्विननेही खेळपट्टीमध्ये दोष नसल्याचं म्हटलं. पण, रिचर्ड्स यांनी एक पाऊल पुढे जात म्हटले की फलंदाजांनी अशा परिस्थितीसाठी स्वतःला तयार केले पाहिजे. (Michael Vaughan यांनी अहमदाबाद पीचवरून ICC वर टीका म्हणाले- ‘भारताला जोपर्यंत सूट मिळत राहील तोवर ICCची स्थिती दात नसलेल्या श्वापदासारखी असेल’)

“इंग्लंडविरुद्ध (England) दुसर्‍या आणि तिसर्‍या कसोटी सामन्याबद्दल मला अलीकडेच प्रश्न विचारले गेले आहेत. आणि या प्रश्नाबद्दल मी थोडासा संभ्रमित आहे कारण असे दिसते की ते ज्या विकेटवर खेळत होते त्याबद्दल बरेच विलाप आणि विव्हळणे होते,”  रिचर्ड्स यांनी फेसबुक पेजवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटले. रिचर्ड्स म्हणाले की, फिरकी-अनुकूल परिस्थितीवर खेळणे ही कसोटी क्रिकेटची फक्त “दुसरी बाजू” आहे. “मला वाटते की जे टीका करतायेत त्यांना हे समजायला हवं की तुम्हाला अनेकदा सीमिंग खेळपट्टी मिळते, गुड लेंथवरुन उसळी घेणारे चेंडू बघितल्यावर ही खेळपट्टी फलंदाजांसाठी समस्या असल्याचं अनेकजण विचार करतात. अनेकदा फलंदाजांना तशा खेळपट्टीचा सामना करावा लागतो. परंतु आता आपण दुसरी बाजू पाहिली आहे आणि म्हणूनच मला वाटते की आपण स्पर्धा करत असताना मनाची इच्छाशक्ती यासह सर्व काही जेणेकरून परीक्षेमुळे त्याला कसोटी सामना क्रिकेट असे नाव देण्यात आले. आणि खेळपट्टी फिरकली साथ देणारी आहे अशी जर तुमची तक्रार असेल तर ती नाण्याची दुसरी बाजू आहे.”

“लोक हे विसरून जात आहेत की आपण भारतात जात असाल तर आपण त्याबद्दल अपेक्षा केली पाहिजे. तुम्ही फिरकीच्या भूमीवर जात आहात. तुम्हाला तिथे कशाचा सामना करावा लागणार आहे याची तुम्ही तयारी करायला हवी.” रिचर्ड्स म्हणाले की, इंग्लंडने तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान मिळालेल्या वेळेचा उपयोग करत परिस्थितीची तयारी करण्यासाठी केला पाहिजे. “रडगाणं गात बसण्यापेक्षा इंग्लंडने परिस्थिती समजून घ्यायला हवी आणि खेळ सुधारवायला हवा. चौथ्या कसोटी सामन्यात आधीच्याच खेळपट्टीवर खेळावं लागेल असा विचार करुन त्यांनी तयारी करायला हवी. जर मी भारतात असतो किंवा खेळपट्टी बनवणं माझ्या हातात असतं तर, चौथ्या कसोटीसाठी मी तशीच खेळपट्टी बनवली असती,” रिचर्ड्स पुढे म्हणाले.