SRH vs DC, IPL 2019 Live Cricket Streaming and Score: सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स Eliminator सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर
SRH vs DC | (Photo Credits: IANS)

SRH vs DC, IPL 2019 Qualifier 2nd Live Cricket Streaming: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या 12 व्या पर्वातील उपांत्यपूर्व फेरीतील दुसरा सामना आज (बुधवार, 8 एप्रिल 2019) सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात रंगत आहे. आजच्या सामन्यात विजेत्या संघाचा मुकाबला उपांत्यपूर्व फेरीतील तिसऱ्या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या संघासोबत होईल. दिल्ली कॅपीटल संघाची या पर्वातील कामगिरी चांगली राहिली आहे. दुसऱ्या बाजूला हैदराबादचा संघही तितकाच दमदार आहे. त्यामुळे आजच्या सामन्याबात प्रचंड उत्सुकता आहे. आजच्या सामन्याचा थरार आपण लाईव्हही पाहू शकता. त्यासाठी आपण आम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जरुर पाहू शकता. हा सामना आज सायंकाळी 7.30 वाजलेपासून रंगतो आहे.

कुठे पहाल लाईव्ह सामना आणि स्कोअर?

Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals सामना तुम्ही टीव्ही प्रमाणे ऑनलाईन देखील पाहू शकता. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच, Star Sports 1/HD, Star Sports 1 Hindi/HD, Star Sports Select 1/HD या चॅनलवर देखील तुम्हाला लाईव्ह सामना पाहता येईल. यासोबतच आपल्याला जर या सामन्याचे लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करु शकता.

Sunrisers Hyderabad आणि Delhi Capitals संघातील संभाव्य खेळाडू

Delhi Capitals: श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), पृथ्वी शॉ, अमित मिश्रा, अवेश खान, राहुल तेवतिया, जयंत यादव, कॉलिन मुनरो, क्रिस मौरिस, संदीप लामिछाने, ट्रेंट बाउल्ट, शिखर धवन, हनुमा विहारी, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, अंकुश बैंस, नाथू सिंह, कोलिन इंग्राम, शेरफेन रदरफोर्ड. (हेही वाचा, IPL 2019: झिवाचे अपहरण करीन, प्रिती जिंटा हिची धोनीला धमकी- जाणून घ्या यामागील कारण)

Sunrisers Hyderabad: केन विलियम्सन (कर्णधार) भुवनेश्वर कुमार, अभिषेक शर्मा, खलील अहमद, रिकी भुई, बासिल थम्पी, श्रीवत्स गोस्वामी, मार्टिन गुप्टिल, दीपक हुड्डा, सिद्धार्थ कौल, मोहम्मद नबी, शहबाज नदीम, टी. नटराजन, मनीष पांडे, यूसुफ पठान, राशिद खान, रिद्धिमान साहा, संदीप शर्मा, विजय शंकर और बिली स्टानलेक.