IPL 2019: झिवाचे अपहरण करीन, प्रिती जिंटा हिची धोनीला धमकी- जाणून घ्या यामागील कारण
MS Dhoni and Ziva (Photo Credits-Instagram)

मुंबई इंडिन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा सामना काल (7 मे) रोजी खेळवण्यात आला. त्यावेळी चेन्नईच्या संघाला पराभव स्विकारावा लागला. तसेच चैन्नईच्या संघाचा शेवटच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) संघाने त्यांना हरवले होते. त्यानंतर प्रिति जिंटा (Preity Zinta) हिने सामना संपल्यावर एमएस धोनी (MS Dhoni) याची भेट घेतली होती. त्यावेळचा एक फोटो प्रिति हिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

या फोटोला प्रितीने कॅप्शन देत असे म्हटले आहे की, धोनी ह्याचे प्रचंड प्रमाणात चाहते असून त्यामधील मी एक आहे. परंतु आता मी झिवा (Ziva) हिची सुद्धा चाहती झाली आहे. त्यामुळे धोनी तु काळजी घे नाहीतर मी झिवाचे अपहरण करीन असे मस्करीत तिने म्हटले आहे. त्याचसोबत चाहत्यांनी फोटोसाठी कॅप्शन काय असावे असा सुद्धा सवाल केला आहे.(ICC Cricket World Cup 2019: अवघ्या 48 तासात विकली गेली भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे)

तसेच प्रिती हिने चैन्नईचा संघ पुढील वर्षी उत्तम कामगिरी करेल असा विश्वास दर्शवला आहे. तर पंजाबच्या शेवटच्या सामन्यानंतर प्रतीने संघाला सपोर्ट केल्याबद्दल आभार मानले.