भारतीय युवा कसोटी सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) सोमवारी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि सह-सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासह फलंदाजीतील अनुभवांबद्दल चर्चा केली. 21 वर्षीय युवा फलंदाजाचा 18 जून रोजी न्यूझीलंड (New Zealand) विरोधात सुरु होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल साम्ण्यासाठी भारतीय संघात (Indian Team) समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी गिल सध्या अन्य खेळाडूंसोबत मुंबईत 14 दिवस क्वारंटाईन आहे. दरम्यान, गिलने कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी खेळाडू रोहित शर्माबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. कोहली आणि शर्मा यांच्यात फलंदाजी करताना कोणता मोठा फरक आहेत याबद्दल पत्रकारांना विचारले असता गिल म्हणाला, “जेव्हा आम्ही खेळाबद्दल बोलतो तेव्हा विराट भाई मला निर्भिडपणे खेळायला सांगतात. ते मानसिकतेबद्दल खूप बोलतात आणि आपले अनुभव सांगतात.” (ICC WTC Final 2021: न्यूझीलंड विरोधात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी कशी असणार टीम इंडियाची सलामी जोडी, ‘विराटसेने’कडे आहे हे 3 पर्याय)
दुसरीकडे, आपला सलामी साथीदार रोहित शर्मासोबत शेअर करताना शुभमन म्हणाला, “जेव्हा मी रोहित भाईंसह फलंदाजी करतो तेव्हा गोलंदाज कोठे गोलंदाजी करतात, परिस्थिती कशी आहे, यावर अवलंबून आम्ही जोखीम घ्यायची की नाही याची चर्चा करतो.” गिलला 2019 मध्ये भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले होते परंतु गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात त्याने पदार्पण केले. आघाडीच्या फलंदाजी क्रमवारीत आक्रमक पवित्रा घेतलेल्या गिलच्या कसोटी क्रिकेटने अनेकांना प्रभावित केले आणि आतापर्यंतच्या सात कसोटी सामन्यात त्याने 378 धावा केल्या असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 91 आहे. तथापि आयपीएल 2021 त्याच्यासाठी कठीण सिद्ध झाले आणि तो सात डावात फक्त 132 धावाच करू शकला.
असे असूनही तो फॉर्मामध्ये पुनरागमन करण्यासाठी आतुर आहे, इंग्लंडमध्ये एक सत्र खेळणे त्याच्यासाठी महत्वाचे ठरेल. "इंग्लंडमध्ये जेव्हा जवळपास ढग येतात तेव्हा चेंडू जास्त फिरतो,आणि जेव्हा सूर्य दिसतो तेव्हा फलंदाजी करणे सोपे होते. सलामीवीर म्हणून त्या अटींचे मूल्यांकन करणे महत्वाचे आहे,” गिलने म्हटले. दुसरीकडे, भारताच्या इंग्लंड दौऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास टीम इंडिया या दौऱ्यावर 18 ते 22 जून दरम्यान न्युझीलंड विरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामना खेळणार आहे. यानंतर संघ ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात यजमान इंग्लंड संघाला 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत टक्कर देण्यासाठी मैदानात उतरेल.