ICC WTC Final 2021: न्यूझीलंड विरोधात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी कशी असणार टीम इंडियाची सलामी जोडी, ‘विराटसेने’कडे आहे हे 3 पर्याय
रोहित शर्मा आणि शुभमन गिल (Photo Credit: Twitter/ICC)

ICC WTC Final 2021: 2 जून रोजी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (ICC World Test Championship Final) आणि नंतर यजमान इंग्लंड (England) विरोधात कसोटी मालिकेसाठी रवाना होण्यापूर्वी टीम इंडिया (Team India) मुंबईत क्वारंटाईन असून खेळाडूंनी कसरत करून सरावला सुरुवात केली आहे. 18 जूनपासून न्यूझीलंड (New Zealand) WTC फायनल सामन्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. पण त्यापूर्वी संघाला योग्य सलामी जोडीची निवड करावी लागणार आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल आणि केएल राहुल (फिटनेसच्या अधीन) फायनलसाठी विराट कोहलीकडे चार पर्याय म्हणून उपलब्ध असतील. यंदा वर्षाच्या सुरुवातीला कसोटी मालिकेत रोहित इंग्लंड विरोधात शानदार फॉर्ममध्ये होता त्यामुळे बहुधा संभाव्य 11 खेळाडूंमध्ये त्याचे स्थान निश्चित मानले जात आहे. म्हणजेच दुसऱ्या स्थानासाठी मयंक, शुभमन आणि राहुल यांच्यात चुरशीची लढाई होऊ शकते. (ICC WTC Final: भारतीय मूळचा ‘हा’ 20 वर्षीय युवा पठ्ठा किवी संघाच्या ताफ्यात, नावात राहुल द्रविड-सचिन तेंडुलकरचे आहे अनोखे मिश्रण)

रोहित शर्मा-शुभमन गिल (Rohit Sharma-Shubman Gill)

गिलला इंग्लंडविरुद्ध सर्व कसोटी सामन्यांमध्ये संधी देण्यात आली होती. त्याचे ठोस तंत्र आणि परिपक्वता त्याला शर्मासमवेत सलामीला येण्याची आणखी एक संधी देऊ शकते. तथापि, अनुकूल परिस्थितीत न्यूझीलंडच्या दर्जेदार वेगवान हल्ल्याचा सामना करण्यासाठी गिलला त्याच्या अननुभवीपणाची किंमत मोजावी लागू शकते. त्याने आतापर्यंत 7 सामन्यात 378 धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल (Rohit Shama-Mayank Agarwal)

शर्मा आणि मयंक अग्रवाल यांच्यात एक गोष्ट समान आहे ती म्हणजे दमदार स्ट्रोकप्ले. दोन्ही फलंदाज सैल चेंडूला सीमारेषे पार पोहचवण्यात अपयशी ठरलेले नाहीत आणि हे न्यूझीलंडविरुद्ध WTC फायनलमध्ये अग्रवालच्या बाजूने ठरू शकेल. आयपीएलमध्ये मयंक चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने कसोटीमध्ये 23 डावांमध्ये 1052 धावा केल्या असून त्याने 21 वेळा सलामीला उतरला आहे.

रोहित शर्मा आणि केएल राहुल (Rohit Sharma-KL Rahul)

अलिकडच्या काळात राहुलने काही दर्जेदार कसोटी क्रिकेट गमावले आहे. तथापि मर्यादित ओव्हरमध्ये त्याने मोलाची कामगिरी केली आहे. 36.83 च्या सरासरीने पाच शतके आणि 10 अर्धशतकांसह सलामीवीर म्हणून राहुलचा गिल आणि अग्रवाल यांच्यापेक्षा उपयुक्त ठरला आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात न्यूझीलंड विरोधात राहुलच्या नावाचा, फिट असल्यास, विचार केला जाऊ शकतो.