निवृत्ती टिप्पणीवरून शोएब मलिक आणि रमीझ राजा यांच्यात ट्विटर वॉर, ट्रोलिंगला प्रत्युत्तरात देत कॉमेंटेटरने केली मलिकची बोलती बंद
रमीझ राजा आणि शोएब मलिक (Photo Credits: Getty)

पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि प्रसिद्ध भाष्यकार रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी अनुभवी अष्टपैलू शोएब मलिकला (Shoaib Malik) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या वृत्तावरून दोघांमध्ये ट्विटरवर युद्ध सुरु झाले. एका मुलाखतीत रमीझने शोएब आणि मोहम्मद हाफिज, (Mohammad Hafeez) या वरिष्ठ क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आदरपूर्वक निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला. या दोन्ही खेळाडूंनी निवृत्ती घ्यावी व युवा खेळाडूंसाठी मार्ग तयार करावा, असे राजा म्हणाले होते. यंदा फेब्रुवारीमध्ये हाफिज आणि शोएबचे पाकिस्तानच्या (Pakistan) टी-20 संघात पुनरागमन झाले. मात्र, रमीज राजाच्या या वक्तव्यावर आता शोएब मलिकने प्रत्युत्तर दिले आहे. मलिकने उपहासात्मक ट्विटमध्ये राजा यांच्यावर निशाणा साधला आणि विचारले की तिघांनीही 2022 पर्यंत निवृत्त व्हावे का? "“हो रमीझ राजा भाई सहमत आहे. आपण तिघेही आपल्या कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात असल्याने एकत्रितपणे निवृत्त होऊ या…मी फोन करतो आणि 2022 साठी याची योजना आखूया ?” मलिकने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर राजा आणि हाफिज यांना टॅग करत लिहिले. (शाहीद आफ्रिदीच्या ऑल-टाइम XI मध्ये फक्त एक भारतीय, पाच पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश)

हाफिजने शांत राहण्याचा निर्णय घेतला, तर मलिकने रमीझ आणि हाफिजला टॅग करत उपहासात्मक ट्विट केले. शोएबच्या ट्विटवर रमीझ यांनी प्रतिक्रिया दिली आणि पाकिस्तानी अष्टपैलूची बोलती बंद केली. प्रत्युत्तरात रमीझने लिहिले,"सन्मानाने निवृत्त, कशामधून? मला पाकिस्तान क्रिकेटबद्दल जे योग्य वाटेल त्याबद्दल मी बोलतो. पाकिस्तान क्रिकेट पुन्हा शीर्षस्थानी पोहचावं अशी माझी इच्छा आहे. मलिक साहेब मी त्याच्यातून कधीच निवृत्त होणार नाही." राजा हे देखील म्हणाले की जर मलिक 2022 पर्यंत निवृत्त झाले तर तो त्यांच्या इतका वृद्ध होईल. “तुम्ही निवृत्तीनंतरच्या योजनांमध्ये, 2022 मध्ये भाष्य करण्यास सुरुवात करणे कठीण होईल कारण तोवर तुमचे वय जवळपास माझ्या इतके वाढेल,” त्यांनी लिहिले.

शोएबचे ट्विट

रमीझ राजाने दिले सडेतोड उत्तर

दरम्यान, मोहम्मद हाफिजने ट्विट करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याने लिहिले, "संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या साथीने लढा देत आहे. सर्वांनी चांगले वागून आणि गरजूंना मदत करण्याचे मी आवाहन करतो. आपला अहंकार आणि नापसंती मागे ठेवा. आपला वैयक्तिक अँजेडा विसरून एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे या."

दरम्यान, टी-20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप घेणार असल्याचे 39, वर्षीय मोहम्मद हाफिजने आधीच जाहीर केले आहे. दुसरीकडे, मर्यादित षटकांच्या स्वरूपात शोएबने अद्याप आपल्या भविष्याबद्दल काही स्पष्ट केले नाही. शोएबने चार वर्षांपूर्वी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.