शाहीद आफ्रिदीच्या ऑल-टाइम XI मध्ये फक्त एक भारतीय, पाच पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश
शाहिद आफ्रिदी (Photo Credit: Getty)

विश्वभर कोविड-19 चा प्रसार झाल्यामुळे सर्वांप्रमाणेच क्रिकेटपटूही घरामध्ये सेल्फ-आयसोलेशनमध्ये आहे. त्यातील अनेक चाहत्यांशी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी, प्रश्न/उत्तर सत्रांचे आयोजन करीत आहे आणि चाहत्यांशी संवाद साधत आहे. काही क्रिकपटू ऑल-टाइम इलेव्हन शेअर करत आहे. यामध्ये आता पाकिस्तानचा (Pakistan) माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीही (Shahid Afridi) सामिल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्न यामध्ये सर्वात सक्रिय असताना आफ्रिदीनेही आपली ऑल-टाइम इलेव्हन शेअर केली आहे. आणि विशेष म्हणजे यात फक्त एका भारतीय क्रिकेटपटूचा त्याने समावेश केला आहे. या दिग्गज क्रिकेटपटूने त्याच्या कारकिर्दीत सोबत किंवा विरुद्ध खेळल्या क्रिकेटपटूंचा समावेश केला आहे. 1996 मध्ये पदार्पण करणारा आफ्रिदी यशस्वी कारकिर्दीत अनेक दिग्गज खेळाडूंसोबत किंवा विरुद्ध खेळला आहे. (शेन वॉर्न ने ऑस्ट्रेलियाच्या ग्रेट वनडे XI एलन बॉर्डर यांची केली कर्णधार म्हणून निवड; सचिन तेंडुलकर, सहवागचा वर्ल्ड वनडे XI मध्ये समावेश)

लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडने अधिकृत YouTube अकाउंटवरून आफ्रिदीचे ऑल-टाइम इलेव्हनचा व्हिडिओ शेअर केला. आफ्रिदीने सलामी फलंदाज म्हणून त्वरित माजी साथीदार सईद अन्वरची निवड केली आणि त्याचे कारण म्हणजे की तो आक्रमक फलंदाजी करतो. अन्वरचा साथीदार म्हणून त्याने अ‍ॅडम गिलक्रिस्टची निवड केली. रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही खेळाडूंनी कारकीर्दीदरम्यान आपल्या देशासाठी जे केले त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहे. या इलेव्हनमध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतील. आफ्रिदी त्याच्या नेतृत्वात बराच खेळला आणि इंझमाम त्याच्या खेळण्याच्या दिवसांत नक्कीच एक उत्तम फलंदाज होता. अष्टपैलू म्हणून आफ्रिदीने दक्षिण आफ्रिकी जाक कालिसची निवड केली.

गिलक्रिस्टसारखा खेळाडू असूनही तो राशिद लतीफची विकेटकीपर म्हणून निवड करत आश्चर्यचकित केले. आफ्रिदीने वसीम अकरम, शोएब अख्तर  आणि ग्लेन मॅकग्रा यांना वेगवान गोलंदाज म्हणून निवडले. आफ्रिदीने इलेव्हनच्या अखेरीससर्वोत्तम फिरकीपटूशेन वॉर्नची निवड केली. एकूणच, 40 वर्षीय आफ्रिदीने ऑल-टाइम इलेव्हनमध्ये पाकिस्तानचे पाच खेळाडू निवडले आणि हा संघ अत्यंत मजबूत दिसत आहे.