वर्ल्डकपमध्ये भारतानं (Team India) पहिल्या मॅचमध्ये आयरलँडला आणि दुसऱ्या मॅचमध्ये पाकिस्तानला पराभूत केलं. भारत आणि अमेरिका (IND vs USA) यांच्यात उद्या लढत होणार आहे. या लढतीत भारतीय संघात बदल होऊ शकतात, अशी शक्यता आहे. पहिल्या दोन्ही मॅचमध्ये चांगली कामगिरी करु न शकलेल्या शिवम दुबेला संघातून डच्चू मिळू शकतो. शिवम दुबेच्या जागी टीम इंडियामध्ये संजू सॅमसन किंवा यशस्वी जयस्वालला संधी मिळू शकते.  ( India Beat Pakistan In T20 World Cup 2024: भारताने पाकिस्तानच्या जबड्यातून हिसकावला विजय, सहा धावांनी केला पराभव; विजयाचे ठरले 'हे' सर्वात तीन मोठे कारण)

आयरलँड विरुद्ध शिवम दुबेनं दोन बॉलचा सामना केला होता. त्यामध्ये त्याला एकही धाव करता आली नव्हती. तर, दुसरीकडे पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये 9 बॉल खेळून 3 धावा केल्या होत्या. शिवम दुबेला बांगलादेश विरुद्धच्या सराव सामन्यात 16 बॉलमध्ये 14 धावा करता आल्या. शिवम दुबेनं त्या मॅचमध्ये दोन विकेट घेतल्या होत्या. शिवम दुबे सराव सामना आणि ग्रुप स्टेजमधील दोन मॅचमधील कामगिरी समाधानकारक नाही. याशिवाय शिवम दुबेच्या कामगिरीवर आयपीएलपासून प्रश्न उपस्थित केले जात आहे.  शिवम दुबेला टीम इंडियात टी 20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाल्यानंतर समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही.

भारत आणि अमेरिका यांच्यातील ग्रुप स्टेजमधील मॅच उद्या होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार उद्या रात्री 8 वाजता मॅच सुरु होईल.भारत आणि कॅनडा यांच्यातील मॅच फ्लोरिडामध्ये होणार आहे. रोहित शर्मा  आणि राहुल द्रविड खेळाडूंना अनेक संधी देतात. त्यामुळं शिवम दुबेला न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या अमेरिकेविरुद्धच्या मॅचमध्ये संधी मिळू शकते. त्यानंतर कॅनडा विरुद्ध संजू सॅमसनला संधी मिळू शकते.