Saurashtra Cricket Association: सौराष्ट्रच्या 5 क्रिकेटर्सकडे सापडले 27 दारूच्या बाटल्या आणि बिअरचे दोन बॉक्स,
Cricket Representative image (Photo credit: Twitter)

चंदीगड विमानतळावर (Chandigarh Airport) सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (Saurashtra Cricket Association) 23 वर्षांखालील संघाकडून 27 दारूच्या बाटल्या आणि बिअरच्या दोन बॉक्स सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 23 वर्षांखालील संघाच्या 5 क्रिकेटर्सच्या किटमध्ये दारूच्या बाटल्या आणि बिअर सापडल्या आहेत. ज्या क्रिकेटपटूंकडून दारूच्या बाटल्या आणि बिअर सापडले ते सीके नायडू ट्रॉफीमधील (CK Nayudu Trophy) सौराष्ट्रच्या 23 वर्षांखालील संघातील आहेत. (हेही वाचा - Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंतने आपल्या कार अपघाताबद्दल पहिल्यांदाच केलं वक्तव्य, पहा व्हिडिओ)

पाहा पोस्ट-

सौराष्ट्रचे क्रिकेटपटू राजकोटला परत जात असताना चंदीगड विमानतळावर कार्गोमध्ये ठेवण्यापूर्वी किटची तपासणी करण्यात आली. सौराष्ट्रातील 5 क्रिकेटपटूंकडे 27 दारूच्या बाटल्या आणि 2 बिअरच्या बाटल्या सापडल्या. अजून या प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, या घटनेने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.

घटना दुर्दैवी आणि असह्य आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची शिस्तपालन समिती आणि सर्वोच्च परिषद या घटनेची सखोल चौकशी करेल आणि योग्य शिस्तभंगाची कारवाई करेल. असे निवेदन सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने केले आहे.