Tilak Verma and Sanju Samson (Photo Credit - X)

IND vs SA 4th T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील (IND vs SA 4th T20I) शेवटचा आणि चौथा सामना जोहान्सबर्ग येथे खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो अगदी योग्य ठरला. या सामन्यात टीम इंडियाने विक्रमांची मालिका केली. संजू सॅमसन (Sanju Samson) आणि तिलक वर्मा (Tilak Verma) यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना झोडपून काढले. या सामन्यात दोन्ही फलंदाजांनी शानदार शतके झळकावली. त्यामुळे टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 283 धावा केल्या.

या सामन्यात नावावर केले अनेक विक्रम 

1. परदेशात भूमीवर सर्वात मोठी धावसंख्या

चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय फलंदाजांकडून धमाका झाला. संजू सॅमसन आणि तिळक वर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येक गोलंदाजाला झोडपून काढले. परदेशी भूमीवर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाची ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे.

2. एका वर्षात 3 शतके ठोकणारा संजू सॅमसन

संजू सॅमसन आज वेगळा दिसत होता. संजू येताच त्याने चौकार आणि षटकार मारले. याआधी दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात संजू खातेही न उघडता बाद झाला. त्यानंतर आता चौथ्या सामन्यात त्याच्या बॅटमधून पुन्हा शानदार शतक झळकले आहे. या मालिकेतील संजूचे हे दुसरे शतक आहे. संजूने पहिल्या सामन्यातही शतक झळकावले होते. आता एका वर्षात तीन टी-20 आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारा संजू जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

3. प्रथमच एका डावात 2 शतके

या सामन्यात संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी भारताकडून शानदार शतके झळकावली. टी-20 सामन्यात दोन फलंदाजांनी शतके ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे. (हे देखील वाचा: IPL Mega Auction 2025 Players List: आयपीएल लिलावातून 1 हजार खेळाडू बाहेर! आता 'या' 574 खेळाडूंवर लावली जाणार बोली)

4. सर्वात मोठी भागीदारी

या सामन्यात टीम इंडियाकडून टी-20 इंटरनॅशनलमधील सर्वात मोठी भागीदारी पाहायला मिळाली. फलंदाजी करताना संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी 210 धावांची नाबाद भागीदारी केली.

5. एका डावात सर्वाधिक षटकार

चौथ्या टी-20 मध्ये भारतीय फलंदाजांकडून षटकारांचा पाऊस पडला. या सामन्यात टीम इंडियाने एकूण 23 षटकार ठोकले. आता टी-20 इंटरनॅशनलमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही टीम इंडियाच्या नावावर झाला आहे. या सामन्यात भारताकडून तिळक वर्माने 10 षटकार, संजू सॅमसनने 9 आणि अभिषेक शर्माने 4 षटकार ठोकले.