One Over Only! सचिन तेंडुलकर ने स्वीकारले महिला क्रिकेटपटू एलिसे पेरी चे आव्हान, एक ओव्हर खेळण्यासाठी करणार पुनरागमन
सचिन तेंडुलकर, एलिसे पेरी (Photo Credit: Twitter)

ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू एलिस पेरी (Ellyse Perry) ने दिलेल्या आव्हानामुळे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) जंक्शन ओव्हल येथे रविवारी होणाऱ्या बिग अपील क्रिकेट सामन्याच्या डबल हेडरमध्ये एक ओव्हर खेळण्यासाठी निवृत्तीतून बाहेर येणार आहे. रविवारी ऑस्ट्रेलियाचा सामना महिला तिरंगी मालिकेच्या सहाव्या सामन्यात इंग्लंडशी होईल तर माजी दिग्गज क्रिकेटपटू बुशफायर रिलीफ निधी जमा करण्यासाठी खेळल्या जाणाऱ्या सामन्यात भाग घेतली. या सामन्याला बुशफायर क्रिकेट बॅश असे नाव देण्यात आले असून याचा सामना मेलबर्नच्या जंक्शन ओव्हल मैदानात खेळला जाईल. क्रिकेट विश्वातील माजी दिग्गज पुरुष क्रिकेटपटू यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या बुशफायर पीडितांच्या मदतीसाठी निधी गोळा कारण्यासाठी खेळणार आहे. इंग्लंड-ऑस्ट्रेलिया महिलांच्या सामन्याच्या डावातील ब्रेकमध्ये पेरी आणि सचिनमध्ये एक ओव्हरचा सामना रंगेल. (Bushfire Cricket Bash मॅचसाठी सचिन तेंडुलकर, युवराज सिंह ऑस्ट्रेलियामध्ये दाखल; SCG ड्रेसिंग रूममधील आवडत्या जागेचा मास्टर-ब्लास्टरने केला खुलासा)

शनिवारी पेरीने ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत सचिनला आव्हान देत म्हणाली: "हे सचिन, बुशफायर सामन्याला ऑस्ट्रेलियामध्ये पाठिंबा देताना आनंद होत आहे. मला माहित आहे की तुम्ही एका संघाला प्रशिक्षित करीत आहात पण आमच्यापैकी काहीजण काल रात्री गप्पा मारत बसलो होतो आणि आम्हाला असे वाटते की डावातल्या ब्रेक दरम्यान एका ओव्हरसाठी तुम्हाला निवृत्तीतून बाहेर आलेले पाहून आनंद होईल." या आव्हानाला उत्तर देत तेंडुलकर म्हणाला: "एलीस छान." बुशफायर बॅशमध्ये सचिन माजी ऑस्ट्रेलियाई कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या संघाचा प्रशिक्षक असेल.

बुशफायर बॅश सामना आज, शनिवारी सिडनी येथे खेळला जाणार होता पण हवामानाच्या अंदाजानुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बिग बॅश लीगच्या अंतिम सामन्यासाठी संभाव्य खेळपट्टी आणि आऊटफील्ड परिस्थिती सुनिश्चित करण्यासाठी खेळाचे वेळापत्रक बदलले. हा सामना आता उद्या, 9 फेब्रुवारीला भारतीय वेळेनुसार सकाळी 9.45 वाजता खेळला जाईल.