सचिन तेंडुलकर SCG मध्ये (Photo Credit: Twitter/sachin_rt)

ऑस्ट्रेलियाच्या (Australia) जंगलात लागलेल्या आग पीडितांच्या मदतीसाठी रविवार, 9 फेब्रुवारी रोजी चॅरिटी क्रिकेट सामना आयोजित केला आहे. याचे नाव बुशफायर क्रिकेट बॅश (Bushfire Cricket Bash) असे ठेवण्यात आले असून क्रिकेट विश्वातील माजी दिग्गज क्रिकेटपटू हा सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) आणि अ‍ॅडम गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) या दोन्ही संघाने नेतृत्व करेल. एक संघ पॉन्टिंग इलेव्हन, तर दुसरा गिलक्रिस्ट इलेव्हन आहे. या संघात खेळणारे अकरा खेळाडू जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पॉन्टिंग इलेव्हनच्या प्रशिक्षकाची भूमिका बजेल. सप्टेंबर 2019 पासून ऑस्ट्रेलियाने बुशफायर समस्येवर झुंज देत आहे ज्यात कमीतकमी 33 मानवी आणि लाखो प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. हा सामना मेलबर्नच्या जंक्शन ओव्हलमध्ये खेळला जाईल. यासाठी सचिन आणि भारताचा माजी सिक्सर किंग युवराज सिंह (Yuvraj Singh) ऑस्ट्रेलियामध्ये पोहचले आहे. (बुश फायर क्रिकेट बॅशसाठी पॉन्टिंग XI विरुद्ध गिलक्रिस्ट XI घोषित; युवराज सिंह, ब्रायन लारा यांचा प्लेयिंग इलेव्हनमध्ये समावेश)

सिडनी येथे आल्यानंतर सचिनने ऐतिहासिक क्रिकेट मैदान सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney Cricket Ground) बराच वेळ घालवला. ऑस्ट्रेलियामध्ये सचिनने याच मैदनावर पहिले शतक केले होते आणि आता या मैदानावर मास्टर ब्लास्टरने त्याच्या आवडत्या स्थानाचा खुलासा केला आहे. यासंदर्भात सचिनने सोशल मीडियावर काही फोटोज शेअर केले, ज्यात त्याने सांगितले की हा त्याचा आवडता कोपरा आहे जिथे तो बसला आहे. सचिनने ट्विटरवर 4 फोटोज शेअर केले आणि फोटोंचे क्रेडिट युवराजला दिले. या बुशफायर सामन्यात युवराज गिलक्रिस्ट इलेव्हनकडून खेळणार असेल. फोटो शेअर करताना सचिनने लिहिले की, "एससीजी (SCG) ड्रेसिंगरूममध्ये हा माझा आवडता कोपरा आहे. आठवणी ताज्या झाल्या."

दरम्यान, सचिनला सिडनी क्रिकेट मैदानाची आजीवन सदस्यता घेतली आहे. 2012 मध्ये एससीजीत हा सन्मान मिळणार सचिन पहिला परदेशी खेळाडू बनला. बुशफायर क्रिकेट बॅश चॅरिटी मॅचच्या आधी एससीजीने सचिन आणि युवराजचे कार्यक्रमस्थळी स्वागत केले. एससीजीने दोघांच्या फोटोसहत पोस्ट शेअर केली.