रिकी पॉन्टिंग, अ‍ॅडम गिलक्रिस्ट (Photo Credit: IANS/Instagram)

रविवारी 9 फेब्रुवारी रोजी मेलबर्नच्या जंक्शन ओव्हल (Junction Oval) मैदानावर बुश फायर क्रिकेट बॅश (Bushfire Cricket Bash) सामना आयोजित केला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) जंगलांमध्ये लागलेल्या आग पीडितांच्या मदतीसाठी या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट बॅशमध्ये दोन संघ आहेत. एक संघ ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) याचा पॉन्टिंग इलेव्हन आहे तर, दुसरा संघ कांगारू संघाचा माजी विकेटकीपर-फलंदाज अ‍ॅडम गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) याचा गिलक्रिस्ट इलेव्हन आहे. आणि या सामन्यापूर्वी दोन्ही संघाच्या प्लेयिंग इलेव्हनजाहीर करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये लागलेल्या भीषण आगीत बाधित झालेल्यांना मदत म्हणून पैसे गोळा करण्याच्याकरण्याच्या उद्देशाने हा चॅरिटी क्रिकेट सामना पहिले शनिवारी होणार होता. मात्र, आता हा सामना रविवारी खेळवण्यात येणार आहे. (बुशफायर चॅरिटी मॅच झाली Reschedule; सिडनीऐवजी 'या' ठिकाणी खेळला जाणार सामना, रिकी पॉन्टिंग-अ‍ॅडम गिलक्रिस्ट चे संघ येणार आमने-सामने)

टीम इंडियाचा माजी सिक्सर किंग युवराज सिंह याचागिलक्रिस्ट इलेव्हनमध्ये समावेश झाला आहे. दुसरीकडे दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर पॉटिंग इलेव्हनच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॉन्टिंग आणि गिलक्रिस्ट यांच्या नेतृत्वात प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. यापूर्वी वॉर्न इलेव्हन विरुद्ध पॉन्टिंग इलेव्हन सामना होणार होता, परंतु सामन्याची तारीख बदलल्या कारणाने अनुभवी फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याला पूर्व नियोजित कामांमुळे माघार घ्यावी लागली आहे. आता हा सामना 10-10 ओव्हर्सचा खेळला जाईल.

पाह दोन्ही संघाचे प्लेयिंग इलेव्हन

पॉन्टिंग इलेव्हन: मॅथ्यू हेडन, जस्टीन लँगर, रिकी पॉन्टिंग (कॅप्टन), एलिस विलानी, ब्रायन लारा, फोएब लीचफिल्ड, ब्रॅड हॅडिन (विकेटकीपर), ब्रेट ली, वसीम अक्रम, डॅन ख्रिश्चन, ल्यूक हॉज. प्रशिक्षक: सचिन तेंडुलकर

गिलख्रिस्ट इलेव्हन: अ‍ॅडम गिलक्रिस्ट (कॅप्टन आणि विकेटकीपर), शेन वॉटसन, ब्रॅड हॉज, युवराज सिंग, अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल, अँड्र्यू सायमंड्स, कोर्टनी वॉल्श, निक रीवोल्ड्ट, पीटर सिडल, फवाद अहमद, (अजून एक जाहीर केले जाईल). प्रशिक्षक: टिम पेन