रिकी पॉन्टिंग (Photo Credits: IANS)

ऑस्ट्रेलियन बुशफायर (Australian Bushfire) पंडितांसाठी खेळवण्यात येणारी चॅरिटी मॅच सिडनीमध्ये मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे एससीजी (SCG) मधून हलवण्यात आले आहे आणि आता रविवारी हा सामना मेलबर्न (Melbourne) येथे खेळला जाईल. या सामन्यात भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर एका प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'बुशफायर क्रिकेट बॅश' (Bushfire Cricket Bash) नावाचा हा सामना यापूर्वी शनिवारी एससीजी येथे खेळवण्यात येणार होता पण आता तो मेलबर्नच्या जंक्शन ओव्हल (Junction Oval) येथे रविवारी खेळला जाईल. सचिन हा रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) इलेव्हनचे प्रशिक्षक असेल तर वेस्ट इंडिजचा गोलंदाजीचा महान कर्टनी वॉल्श ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज अ‍ॅडम गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) याच्या नेतृत्वातील गिलक्रिस्ट इलेव्हन संघाचे प्रशिक्षक असतील.

ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज शेन वॉर्न संघाचे नेतृत्व करणार होता परंतु तारीख बदलल्यामुळे पूर्वीच्या वचनबद्धतेमुळे तो या सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही आणि cricket.com.au ने दिलेल्या माहितीनुसार गिलख्रिस्ट कर्णधारपदाचा कार्यभार स्वीकारेल. प्रदर्शन सामना 10-षटकांचा असेल, पाच ओव्हर्स पॉवरप्ले, गोलंदाजीचे कोणतेही बंधन नसलेले. यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विटरद्वारे जाहीर केले होते की 8 फेब्रुवारी रोजी होणार सामना तेथील वातावरण आणि बिग बॅश लीगच्या अंतिम सामन्यासाठी तयार केलेली खेळपट्टी पाहता हा सामना मेलबर्नला हलविण्यात आला.

सचिन पॉन्टिंग इलेव्हनचा प्रशिक्षक असेल, तर माजी 'सिक्सर किंग' युवराज सिंह एका संघाकडून खेळताना दिसेल. या सामन्यात जस्टिन लँगर, मॅथ्यू हेडन, ब्रेट ली, अँड्र्यू सायमंड्स आणि शेन वॉटसनसारखे दिग्गज खेळाडू सहभागी होतील. खेळाचे ठिकाण आणि वेळ बदलल्यामुळे कांगारूंचा माजी कर्णधार मायकल क्लार्क आणि मायकल हसी सामन्यात सहभागी होणार नाहीत. या सामन्यात ब्रायन लारा देखील एका संघाकडून खेळेल.