(Photo Credits: IANS)

वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध सामन्याआधी भारताचा जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) टीमच्या इनडोर नेट्समध्ये सराव करताना दिसला आणि तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याची चर्चा सुरू झाली. विश्वकपमध्ये भारताने अजून एकही सामना गमावला नाही आणि इंडिज विरुद्ध आपली विजयी कामगिरी कायम राखण्याच्या उद्देशाने हा सामना खेळतील. या सामन्यासाठी टीम पुढे एक मोठा प्रश्न आहे की भुवनेश्वर कुमार ला संघात जागा देऊन मोहम्मद शमी (Mohammed Shami) ला आराम द्यावा? (IND vs WI मॅचआधी भुवनेश्वर कुमार ने नेट्समध्ये केली गोलंदाजी, वेस्ट इंडिज विरुद्ध खेळण्यावर गूढ कायम Video)

हा प्रश्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ला प्रसारमाध्यमाने विचारले असता तो म्हणाला, 'जर भुवी फिट असेल तर मी त्याची निवड करेन फक्त त्याच्या बॉल स्विंग करण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे. आपल्या बॉल स्विंग बॉलिंग ने तो वेस्ट इंडिज फलंदाजांना त्रास देऊ शकतो.' सचिन ची ही निवड कराच आश्चर्यजनक आहे कारण अफघानिस्तान विरुद्ध सामन्यात शमी ने हॅट-ट्रिक घेत संघाला विजय मिळवून दिला होता.

भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) सामन्यात हॅमस्ट्रिंग दुखापत झाल्यानंतर भुवनेश्वर अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्ध सामन्याला मुकावे लागले होते.मात्र, भुवनेश्वर मंगळवारी मँचेस्टरमधील इनडोअर नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसला. परंतु त्याला वेस्ट इंडिज विरुद्ध सामन्यात प्लेयिंग इलेव्हन मध्ये स्थान मिळणार कि नाही यावर अद्याप टीम व्यवस्थान कडून कोणतेही भाष्य केले गेले नाही.