(Image Credit: BCCI Video)

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आपल्या दुखापतीतून बारा झालेला दिसतोय. पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध मॅच दरम्यान भुवी ला दुखापत झालेली त्यामुळे त्याला सामना अर्ध्यातच सोडून परतावे लागले होते. पण आता, असं दिसतंय की भुवनेश्वर त्याच्या दुखापतीपासून सावरला आहे आणि मैदानावर येण्यास तयार आहे. ओल्ड ट्रॅफोर्ड (Old Trafford) येथे भारताच्या इनडोर प्रॅक्टिस सत्रात भुवी नेट्समध्ये बॉलिंग करताना दिसला. त्यामुळे तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, भुवनेश्वर ला वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध संघात स्थान मिळेल की नाही या वर अजून कोणतीही माहिती नाही आहे. अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्ध खेळताना, भुवनेश्वर च्या जागी मोहम्मद शमी (Mohammed Shami) ला संघात स्थान दिले गेले होते. (IND vs WI, CWC 2019: हे 3 वेस्ट इंडिज खेळाडू ठरतील घातक, आपल्या खेळी ने बदलू शकतात संपूर्ण मॅच)

भारतीय क्रिकेट बोर्ड, बीसीसीआय (BCCI) ने भुवनेश्वर च्या सरावाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भुवी धडधाकड दिसत आहे. भुवनेश्वर आपल्या दुखापतीतून बारा होणे हा चहत्त्यांसाठी आनंदाची वार्ता आहे.

भारताची विश्वकपमधील वाटचाल जोरात सुरू आहे. आतापर्यंत पाच सामन्यांत चार विजय मिळवत भारत 9 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्याविरुद्ध विजय मिळवले, तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला.