IND vs WI, CWC 2019: हे 3 वेस्ट इंडिज खेळाडू ठरतील घातक, आपल्या खेळी ने बदलू शकतात संपूर्ण मॅच
(Photo Credit: Getty Image)

विराट कोहली (Virat Kohli) च्या टीम इंडिया ने आपल्या गोलंदाजी च्या जोरावर अफगाणिस्तान (Afghanistan) संघावर विजय मिळवला. या विजयासह भारत विश्वकपमध्ये अजून अपराजित राहिला आहे. भारताचा पुढील सामना वेस्ट इंडिज (West Indies) संघाशी ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानावर खेळाला जाईल. यंदाच्या विश्वकप मध्ये वेस्ट इंडिजचा संघ संघर्ष करताना दिसत आहे. 6 पैकी एका सामन्यात विजय मिळवून इंडिज संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. (भारत विरुद्धच्या सामान्याआधी विंडीज टीम ला मोठ धक्का; अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल दुखापतीमुळे वर्ल्डकप मधून बाहेर)

भारत (India)-वेस्ट इंडिज सामना टीम इंडिया साठी महत्वाचा असणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ सेमीफायनल कडे आपलं एक पाऊल पुढे ठेवतील. दुरीकडे सततच्या पराभवामुळे वेस्ट इंडिज संघाचं सेमीफायनलसाठी पात्र होण्याची शक्यता कमी होत चालली आहे. अफगाणिस्तान सामन्यानंतर भारतीय संघांसमोर बरेच प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे ते ओल्ड ट्रॅफर्डमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध सामन्यात शोधण्याचा प्रत्यन करतील. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याआधी आपण बघूया 3 खेळाडू जे टीम इंडियासाठी घातक ठरू शकतात:

शिमरोन हेतमायेर (Shimron Hetmyer)

(Image Credit: Twitter)

मागील वर्षी भारत विरुद्ध खेळलेल्या वनडे मालिकेत हेतमायेर ने चांगले प्रदर्शन करत क्रिकेट विश्वात आपले अस्तित्व जाणवून दिले. भारत विरुद्ध त्याने आपली सर्वात विध्वंसक खेळ केले होता. वयाच्या फक्त 22 व्य वर्षी हा डावखुरा फलंदाज वेस्टइंडीज संघाचा एक महत्त्वाचा सदस्य बनला आहे. तो वेगवान तसेच फिरकी गोलंदाजी विरुद्ध चांगली खेळी खेळण्यास समर्थ आहे. फिरकी गोलंदाजीवर तो मोठे षटकार मारण्यासही सक्षम आहे. भारत विरुद्ध वनडे मालिकेत त्याने कुलदीप यादव (Kuldeep Yadav)आणि युझवेन्द्र चहल (Yuzvendra Chahal) या जोडीच्या विरुद्ध यशस्वीरित्या फलंदाजी केली होती.

ख्रिस गेल (Chris Gayle)

(Photo Credit: Getty Image)

'युनिव्हर्स बॉस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेल ने यंदाच्या विश्वकप मध्ये निराशाजनक खेळी केली आहे. गेलने आतापर्यंत विश्वकप मध्ये 38.8 च्या सरासरीने 194 धावा केल्या आहेत. त्याने न्यूझीलंड विरुद्ध संतोष जनक खेळी करत 84 चेंडूत 87 धावा केल्या. गेल भारताविरूद्ध बरेच खेळाला आहे आणि त्यामुळे तो भारतीय गोलंदाजीच्या शैली शी परिचित आहे. भारत विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये गेल ने चार शतक आणि पाच अर्धशतकांच्या मदतीने 1000 धावा केल्या आहेत.

गेल फिरकी गोलंदाजी विशेषतः चांगली खेळतो आणि भारताच्या फिरकी गोलंदाजांना त्याच्या पासून धोका आहे. दरम्यान, यंदा जरी ख्रिस गेल चांगली खेळी खेळाला नसेल, तरी यात शंका नाही की वेस्ट इंडिजसाठी मोठी खेळी खेळण्यास महत्त्वाचा खेळाडू असेल.

शेल्डन कॉट्रेल (Sheldon Cottrell)

(Photo Credit: Getty Image)

शेल्डन कॉट्रेल, वेस्ट इंडिज चा जलद गोलंदाज, विश्वचषक 2019 मध्ये आपल्या गोलंदाजीमुळेच नव्हे, तर विकेट घेतल्यानंतर त्याच्या उत्सवांसाठीही चर्चेचा विषय बनला आहे. कॉट्रेल, ६ सामन्यात ९ विकेट्स घेऊन वेस्ट इंडिजचा आघाडीचा गोलंदाज आहे. आपल्या गोलंदाजीबरोबरच, उल्लेखनीय झेल आणि रन-आउटच्या स्वरूपात त्याचे योगदान त्याला संघासाठी क्षेत्ररक्षणामध्ये एक्स-फॅक्टर बनवते.

कॉट्रेल हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे आणि भारतीय फलंदाजांच्या डाव्या हाताच्या या गोलंदाजांना विरुद्ध इतिहास बघितल्यास त्याला अधिक धोकादायक बनवते. शिखर धवन ही संघात नसल्याने टीम इंडिया ला अजून सावध राहायची गरज आहे.