27 जून रोजी, भारत विरुद्ध वेस्ट इंडीजचा (West Indies) निर्णायक सामना खेळला जाणार आहे. दोन्ही बाजूचे खेळाडू सध्या तयारीमध्ये व्यस्त असताना, वेस्ट इंडीज संघासाठी अतिशय वाईट बातमी आहे. संघाचा ऑलराउंडर खेळाडू आंद्रे रसेल (Andre Russell) दुखापत झाल्यामुळे विश्वचषक सामन्यांमधून (ICC Cricket World Cup 2019) बाहेर पडला आहे. आता आंद्रे रसेलच्या जागी सुनील अंब्रीस (Sunil Ambris) हा खेळाडू खेळणार आहे. रसेल याधीही दुखापतीमुळे न्यूझीलंड विरुद्धचा सामना खेळू शकला नाही.
BREAKING: Andre Russell has been ruled out of the rest of #CWC19 through injury. Sunil Ambris will join the West Indies squad as his replacement.#CWC19 | #MenInMaroon pic.twitter.com/BuhWdjskzq
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 24, 2019
सर्वांनीच रसेलचा या विश्वकपसाठीचा संघर्ष पाहिला आहे. आता रसेलचे बाहेर जाणे हा त्याच्या चाहत्यांसाठी फार मोठा धक्का आहे. आयपीएल 12 मधील धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर विश्वकरंडक संघात रसेल यांना समाविष्ट करण्यात आले होते. मागील सामन्यात वेस्ट इंडिजला न्यूझीलंडकडून केवळ 5 धावांनी हार पत्करावी लागली होती. वेस्टइंडिजने आतापर्यंत 6 सामन्यात फक्त एक सामना जिंकला आहे. (हेही वाचा: इम्रान खान च्या सहाय्यकाने शेअर केला पाकिस्तानी पंतप्रधानांऐवजी सचिन तेंडुलकर चा फोटो)
सुनीलने आयर्लंडविरुद्ध 126 चेंडूंत 148 धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीमुळे वेस्टइंडीज संघाने आयर्लंडविरुद्ध 328 धावांचे लक्ष्य सहज पुरे केले. या सामन्यात वेस्ट इंडीजने 5 गडी राखून विजय मिळविला होता.