इम्रान खान च्या सहाय्यकाने शेअर केला पाकिस्तानी पंतप्रधानांऐवजी सचिन तेंडुलकर चा फोटो; Netizens ने हास्यास्पद मिम्स द्वारे केल ट्रोल
(Photo Credit: Twitter)

पाकिस्तान (Pakistan) चे नागरिक सोशल मीडिया पासून लांब राहूच शकत नाही. एकी कडे त्यांचा क्रिकेट संघ विश्वकप मधील आपल्या निराशाजन खेळासाठी ट्रोल होत आहे, त्यांची निंदा केली जात आहे. दुसरीकडे त्यांचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या जवळच्या सहकारी ने एक फोटो शेअर करत यात भर घातली आहे. इम्रान यांचे जवळचे सहकारी नईम उल हक (Naeem ul Haque) त्यांनी त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटो कॅप्टशन देत नईम ने लिहिले, "पीएम इम्रान खान 1969." (ICC World Cup 2019: सर्फराज अहमद आणि पाकिस्तानी संघाविरुद्ध कठोर कारवाई करा, कामरान अकमलची इम्रान खान कडे मागणी)

मात्र, या प्लॅटमधील तरुण मुलगा दुसरा कोणी नाही तर प्रत्यक्षात क्रिकेटचा देव- सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे. सोशल मीडियावर लोकांनी ही चूक लक्षात घेत गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या. नईमच्या ट्विट वर आपली प्रतिक्रिया देत नेटिझन्स नईमलाच ट्रोल करत आहेत.

इम्रान खान तेंडुलकर? की तेंडुलकर इम्रान खान?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे तर सर डॉन ब्रॅडमन