
दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) ब्लॉमफोन्टेनच्या मंगांग ओवल स्टेडियम तीन सामन्यांच्या वनडे मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात आमने-सामने येतील. यजमान आफ्रिकन पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 74 धावांनी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला ज्या प्रकारे पराभूत केले, त्यावरून आता ती शक्ती दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीत परतली आहे असे दिसले. दक्षिण आफ्रिकेने पाहिले फलंदाजी केली आणि 291 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया हे लक्ष्य सहजतेने गाठेल असे वाटत होते, मात्र त्यांचा पूर्ण संघ 217 धावांवर ऑलआऊट झाला. आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने वनडे कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले. त्याने 114 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 123 धावा केल्या. दुसऱ्या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग आणि थेट प्रक्षेपणाबाबत माहिती खालील प्रमाणे आहे. (SA vs AUS 2nd T20I: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध स्टिव्ह स्मिथ बनला 'सुपरमॅन', हवेत उडी मारून टीमसाठी रोखल्या सहा धावा Video)
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधील दुसरा वनडे सामना मंगांग ओवल स्टेडियमनमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी 4:30 वाजता सुरु होईल. भारतीय चाहत्यांसाठी या सामन्याचे थेट प्रक्षेपण Sony Six आणि Sony Six HD वर उपलब्ध असेल. सामन्याचं ऑनलाईन स्ट्रीमिंग भारतात Sony Liv वर पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलियाकडे मालिकेत बरोबरी करण्याचीही अंतिम संधी असेल. दुसऱ्या सामन्यात पराभव म्हणजे, ऑस्ट्रेलियाने मालिका गमावली. ऑस्ट्रेलियासाठी हा सामना करो-वा-मरो सारखा आहे. यापूर्वी, दोन्ही देशांमध्ये टी-20 मालिका खेळण्यात आली होती, ज्यात ऑस्ट्रेलियाने दमदार विजय मिळवला होता.
असा आहे दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया वनडे संघ
दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (कॅप्टन), टेंबा बावुमा, डेव्हिड मिलर, आदिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, लुंगी एनगिडी, ब्युरन हेन्ड्रिक्स,हेनरिक क्लासेन, जनमन मालन, जे जे स्मट्स, एनरिच नॉर्टजे, लुथो सिपामला, केशव महाराज, काइल वेर्रेने.
ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कॅप्टन), एश्टन एगर, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, जोश हेझलवुड, मार्नस लाबूशेन, मिच मार्श, केन रिचर्डसन, डार्सी शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, एडम जम्पा.