स्टिव्ह स्मिथ (Photo Credit: Twitter)

स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आल्यापासून आकर्षणाचा केंद्र बनला आहे. पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात डेड बॉल मारण्याच्या कल्पनेचा शिकार झालेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजाची आता प्रशंसा केली जात आहे. रविवारी पोर्ट एलिझाबेथ येथे दक्षिण आफ्रिकाविरूद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात स्मिथने आश्चर्यकारक क्षेत्ररक्षण करत प्रेक्षकांकडून कौतुक करवून घेतले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डी कॉकची (Quinton de Kock) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीच्या निर्णयाने याची सुरुवात झाली. आफ्रिकेच्या कर्णधाराने आक्रमक डाव खेळत संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिला सामना जिंकलेल्या संघासमोर मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. पण डावाच्या सहाव्या षटकात डी कॉकच्या शॉटवर स्मिथने शानदार क्षेत्ररक्षण सादर केले आणि फलंदाजांना 6 धावाऐवजी फक्त 1 धावा घेण्यास भाग पाडले.

ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज एडम ज़म्पा गोलंदाजी करत होता. त्याने शॉर्ट लेंथ चेंडू टाकला ज्याच्यावर डी कॉकने डीप मिडविकेटच्या वरून षटकार मारण्याचा प्रत्यत्न केला. पण स्मिथने बॉल बाउंड्री लाईनवर पकडण्यासाठी हवेत उडी मारली आणि चेंडू सीमारेषाच्या आत फेकला. स्मिथ जमिनीवर पडला आणि लवकरच बॉलकडे धाव घेतली. फलंदाजाला षटकार जाणार असल्याचे वाटले असताना स्मिथने सर्वोत्तम क्षेत्ररक्षण केले आणि त्याला अवघ्या 1 धावांवर समाधान मानावे लागले. पाहा हा व्हिडिओ:

दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघ रविवारी दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानावर मात करू शकला नाही. डी कॉक (70) आणि लुंगी एनगिडीच्या तीन विकेटच्या दमदार प्रदर्शनच्या जोरावर दक्षिण अफ्रीकाने रविवारी दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्‍ट्रेलियाला 12 धावांनी पराभूत केले आणि मालिकेत १-१ ने बरोबरी केली.