भारताने आयोजित केलेला विश्वचषक 2023 लवकरच सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ चषक घरी आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र भारताचा माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी रोहितच्या खेळण्याच्या शैलीबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 1983 मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाचा कर्णधार कपिल देव याने सध्याचा कर्णधार रोहित शर्माला आपल्या फलंदाजीची शैली बदलावी लागेल, असे मत व्यक्त केले आहे. त्याला आक्रमक होण्याची गरज आहे. (हे देखील वाचा: Asia Cup 2023: स्टार स्पोर्ट्सने भारत-पाकिस्तान सामन्याचा प्रोमो केला प्रसिध्द, 2 सप्टेंबरला होणार लढत (Watch Video)
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत कपिलने सांगितले की, "रोहित एक उत्तम कर्णधार आहे, पण त्याला मैदानावर अधिक आक्रमक होण्याची गरज आहे." या काळात कपिल देव यांनी इंग्लंडच्या बेजबॉल शैलीचे कौतुक केले. ते म्हणाले की “इंग्लंडची बेजबॉलची शैली विलक्षण आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिका खूपच रोमांचक होती, बऱ्याच दिवसांनी अशी मालिका पाहायला मिळाली. मला वाटतं क्रिकेट असाच खेळला पाहिजे. टीम इंडियाच्या या रणनीती अंतर्गत खेळण्याबद्दल मला वाटते की प्रत्येक संघाची स्वतःची वेगळी रणनीती असते आणि प्रत्येकाचे लक्ष्य जिंकणे असते.
कपिल देव म्हणतात, “इंग्लंडसारखा संघ कसा खेळतो याचा विचार करावा लागेल. केवळ आपणच नाही तर सर्वच क्रिकेट खेळणाऱ्या देशांनी असा विचार केला पाहिजे. खेळ जिंकणे हे संघांचे प्राधान्य असले पाहिजे.” भारताने विश्वचषक जिंकल्याबद्दल कपिल यांना विचारले असता ते म्हणाला की, “भारताने प्रथम चारमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच त्यांनी पुढचे नियोजन करावे. उपांत्य फेरीसारख्या सामन्यांमध्येही तुमची किस्मत हवीच, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अव्वल चारमध्ये पोहोचणे.
विश्वचषक 2023 भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ज्यामध्ये भारतीय संघाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. तर 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे.