IND vs PAK: स्टार स्पोर्ट्सने (Star Sports) 2 सप्टेंबर रोजी होणार्‍या भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील आशिया कप (Asia Cup 2023) सामन्याचा प्रोमो (Promo) प्रसिद्ध केला आहे. स्टार स्पोर्ट्सने 15 ऑगस्टला ट्विटरवर हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. आशिया चषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचले तर दोघांना तीनदा आमनेसामने सामोरे जावे लागू शकते. आशिया चषक 2023 च्या आधी, स्टार स्पोर्ट्सने सोशल मीडियाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर भारत विरुद्ध पाकिस्तानचा प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये तुम्ही भारताच्या विजयासाठी तिरंगा फडकवण्याची तयारी करत असलेला चाहता पाहू शकता. स्टार स्पोर्ट्सचा हा प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 11 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

पहा प्रोमो

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)