Rishabh Pant (Photo Credit - ANI)

गेल्या शुक्रवारी क्रिकेटपटू ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला. सध्या पंतवर देहरादून येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत पण पुढील उपचारासाठी त्याला मुंबईत दाखल करणार असण्याचा निर्णय डीडीसीएने घेतला आहे. पंतच्या कापाळाला, उजव्या गुडघ्याला, हाताला आणि बॅकला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. तरी लवकरात लवकर उत्तम उपचार होवून ठणठणीत बरे होण्यासाठी ऋषभला मुंबईत हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी डीडीसीए सध्या ऋषभ पंतच्या कुटुंबियाच्या संपर्कात असल्याची माहिती एएनआयला दिली आहे. तर ऋषभला मुंबईत नेमक कधी आणि कुठल्या हॉस्पिटलला हलवणार याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण क्रिकेटपटू ऋषभ पंत लवकरात लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना ऋषभचे फॅन्स तसेच प्रत्येक भारतीय करत आहे. मुंबईतील विशेष उचार घेतल्या नंतर ऋषभ लवकरात लवकर ठणठणीत बरा होईल अशी अपेक्षा ऋषभच्या कुटुंबियांसह त्याच्या मित्रपरिवारास आहे.

 

ऋषभला त्याच्या अस्थिबंधनाच्या दुखापतीचे निदान आणि उपचारांसाठी मुंबईला हलवण्यात येणार आहे. बीसीसीआय आरोग्य विभागातील प्रसिद्ध क्रीडा ऑर्थोपेडिक डॉ दिनशॉ परडीवाला यांच्या देखरेखीखाली ऋषभ पंतवर इलाज होणार आहे. तरी ऋषभवर  शस्त्रक्रिया होणार की नाही याबातचा निर्णय ऋषभच्या पुढील उपचारावर अवलंबून आहे, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला याबाबत माहिती दिली आहे. (हे ही वाचा:- Team India च्या खेळाडूंनी Rishabh Pant लवकर बरा व्हावा यासाठी दिल्या शुभेच्छा, BCCI ने व्हिडीओ केला शेअर (Watch Video))

 

गेल्या आठवड्यात दुभाजकाला धडकुन ऋषभ पंतचा उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातील NH-58 वर अपघात झाला होता. या अपघातात ऋषभची गाडी जळून खाक झाली पण सुदैवाने ऋषभ कारची खिडकी तोडून बाहेर आला. दरम्यान या अपघातात ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली आहे. पंतने अद्यापही स्वतच्या पायावर व्यवस्थित उभा राहता येत नाही. तरी पुढील उपचारासाठी बीसीसीआयने स्वत:च्या डॉक्टरांच्या निर्दशनाखाली पंतला मुंबईत हलवले आहे. सकारात्मक बातमी अशी की पंतच्या मणक्याचे आणि मेंदूचे स्कॅन नॉर्मल आले आहे. तरी आणखी काही गंत्रीर जखमांवरील उपचारासाठी ऋषभला मुंबईत हलवल्याची माहिती मिळत आहे.