Srilanka Cricket Team (Photo Credits: PTI)

भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने बुधवारी लाहोर येथे पाकिस्तान-श्रीलंका तिसऱ्या टी-20 मॅचदरम्यान वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) आणि रमीझ राजा (Ramiz Raza) यांच्या सामन्यानंतरच्या सादरीकरणातून आपला 'एलएमएओ' क्षण सोशल मीडियावर शेअर केला आहे. पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम टी-20 मॅचमध्ये श्रीलंकाने (Sri Lanak) 13 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 3-0 ने व्हाईट वॉश पूर्ण केला. वनिंदू हसरंगा याने श्रीलंकाकडून 4 ओव्हरमध्ये 21 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्यांच्या मुख्य खेळाडूंशिवाय दौरा करणाऱ्या श्रीलंकेने यजमानांवर वर्चस्व राखले आणि या मालिकेतील त्यांचे कौशल्य कौतुकास्पद होते. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनदरम्यान रमीझ राजाने या तरूण मुलाच्या कामगिरीचे कौतुक केले. यादरम्यान, राजाने हसरंगाची मुलाखत घेतली आणि एक हास्यास्पद प्रसंग घडला जो एका सोशल मीडिया यूजरने शेअर केला आणि अश्विनने त्याला रिट्विट केले. (क्रिकेटच्या मॅचदरम्यान पाकिस्तानी अंपायर नसीम शेख यांना हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू)

पोस्ट मॅच प्रेसेंटेशनदरम्यान राजाने हसरंगाला यंदाच्या मॅचमधील ही  त्याच्या त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे का असे विचारले असता श्रीलंकेच्या युवा खेळाडूने हो म्हणून उत्तर दिले. हंसरंगासोबत एक दुभाषी होता. त्या दुभाषीने (श्रीलंकेच्या खेळाडूसाठी) रझासाठी त्वरित त्याच्या होयचे भाषांतर केले. ज्यामुळे अश्विनला त्याचे हसू अनावर झाले. हा मजेदार व्हिडिओ शेअर करत अश्विनने 'एलमाओ' मॉर्निंग कॅप्शन देत शेअर केला.

मॅचबद्दल बोलले तर, श्रीलंकेने ओशादा फर्नांडो याच्या उत्कृष्ट अर्धशतकाच्या खेळीमुळे आणि वनिंदू हसरंगाच्या शानदार गोलंदाजीमुळे पाकिस्तानचा व्हाईट वॉश पूर्ण केला. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या तिसर्‍या टी-20 सामन्यात आठव्या क्रमांकावरील श्रीलंकन तीनही टी -20 सामन्यांमध्ये आयसीसीच्या पहिल्या क्रमांकाच्या पाकिस्तानला पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला आहे. या सामन्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हसरंगाला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. यापूर्वी, श्रीलंकेने पहिल्या आणि दुसर्‍या सामन्यात पाकिस्तानला अनुक्रमे 64 धावा आणि 35 धावांनी पराभूत केले होते.