क्रिकेटच्या मॅचदरम्यान पाकिस्तानी अंपायर नसीम शेख यांना हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Getty Images)

क्रिकेटच्या सामन्यादरम्यान गेल्या काही दिवांपासून दुर्घटना घडत असल्याचे प्रकार फार घडत आहेत. एका सामन्यादरम्यान इंग्लंडचा वेगवाग गोलंदाज जोफ्रा आर्चर याने खेळी केलेला चेंडू ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव स्मिथ याला लागला होता. त्यामुळे त्याला क्रिकेटच्या मैदानातूनच ताबडतोबत बाहेर जावे लागले होते. दुखापत झाल्याने पुन्हा कधीच स्टीव स्मिथ फलंदाजी करण्यासाठी उतरला नाही. तसेच पुढील टेस्ट मॅच सुद्धा स्मिथ याला खेळता आली नाही.

आजचा दिवस हा पाकिस्तानी क्रिकेटसाठी एक अत्यंत वाईट ठरला आहे. कारण श्रीलंका संघाच्या विरोधात टी20 सीरिज सुरु असताना पाकिस्तानच्या संघाला परभाव स्विकारावा लागला. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी अंपायरला हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे.(PAK vs SL 1st T20I: श्रीलंकाविरुद्ध 19 मोहम्मद हसनैन याचा वर्ल्ड रेकॉर्ड, टी-20 मध्ये हॅट-ट्रिक घेणारा सर्वात युवा गोलंदाज)

नसीम शेख (Naseem Sheikh) असे पाकिस्तानी मृत अंपाअरचे नाव आहे. एका क्लब टूर्नामेंट सामन्यादरम्यान अंपायरिंग करताना शेख यांना अचानक हृदय विकाराचा झटका आल्याने ते जमिनीवर कोसळून पडले. या प्रकारामुळे घटनास्थळी उपस्थितीत असलेल्या लोकांनी त्यांच्यासाठी स्ट्रेचरल बोलावून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यापूर्वीच शेख यांचा मृत्यू झाला. नसीम शेख हे 56 वर्षाचे होते.

याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया संघाचा क्रिकेटर फिलिप ह्युज आणि भारतीय क्रिकेटर रमन लांबा यांचा सामन्यादरम्यान चेंडू लागून मृत्यू झाला. ह्युज याला गोलंदाजी करताना आणि लांबा याला फिल्डिंग करताना चेंडू लागून दुर्घटना घडली होती.