मोहम्मद हसनैन (Photo Credit: Getty)

शनिवारी श्रीलंका (Sri Lanka) संघाविरूद्ध पाकिस्तानच्या (Pakistan) युवा गोलंदाज मोहम्मद हसनैन (Mohammad Hasnain) याने इतिहास रचला आहे. 19 वर्षीय हसनैन आंतरराष्ट्रीयटी-20 सामन्यात हॅटट्रिक घेणारा जगातील सर्वात तरुण गोलंदाज ठरला. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियम (Gaddafi Stadium) मध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये हसनैनने श्रीलंकेच्या तीन फलंदाजांना सलग तीन चेंडूंत बाद केले आणि वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. हसनैनने पहिले 16 व्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर भानुका राजपक्षे (Bhanuka Rajapaksa) याला बाद केले. त्याच्यानंतर, 19व्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर त्याने दसुन शनका (Dasun Shanaka) आणि शहान जयसूर्या (Shehan Jayasuriya) यांना मैदाना बाहेर पाठवले. विशेष म्हणजे हॅटट्रिक बद्दल त्याला आणि त्याच्या संघाला त्याच्या हॅट-ट्रिकबद्दल माहितच नव्हते. जेव्हा संपूर्ण टीम ड्रेसिंग रूममध्ये पोहोचली तेव्हा त्यांना सांगण्यात आले की हसननने हॅटट्रिक घेतली आहे.

19 वर्षीय हसनैन टी-20 सामन्यात हॅटट्रिक घेणारा सर्वात तरुण गोलंदाज आहे. हसनैनने त्याच्या फक्त दुसर्‍या सामन्यात ही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात हॅटट्रिक घेणारा हसनैन, हा दुसरा पाकिस्तानी गोलंदाज आहे. त्याच्यापूर्वी, फहीम अशरफ याने हे कामगिरी बजावली आहे. आणि विशेष म्हणजे 2017 मध्ये फहीमनेही श्रीलंकाविरुद्ध हॅटट्रिक पूर्ण केली होती. दुसरीकडे, 1991 अकीब जावेद याने 19 वर्ष 81 व्या दिवशी भारतविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती, परंतु ती आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात होती. त्यामुळे, टी-20 मॅचमध्ये हॅटट्रिक घेणारा हसनैन हा सर्वात युवा खेळाडू आहे. दरम्यान, हसनैनची हॅटट्रिक व्यर्थ गेली, कारण ३ संनयायच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंकन 64 धावांनी विजय मिळवला.

हसनैन 19 वर्षांचा असून पाकिस्तानमधील वेगवान गोलंदाजांमध्ये त्यांचा समावेश आहे. तो पाकिस्तान सुपर लीगपासून चर्चेत आला होता. या स्पर्धेत त्याच्या शानदार कामगिरीमुळे त्याची विश्वचषक 2019 पूर्वी पाकिस्तान संघातही निवड झाली होती. पण, त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. हसनैन, ताशी 150 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करण्यास माहिर आहे. तसेच, त्यांचे यॉर्कर्स देखील अगदी अचूक आहेत.