RR Vs CSK (Photo Credit: Instagram)

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सामन्यात राजस्थान रॉयल्सचा संघाने (Channai Super Kings Vs Rajasthan Royals) 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात चेन्नईच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थानच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे चेन्नईच्या संघाला 20 षटकांत 6 बाद 125 धावांपर्यंतच मजल मारता आली आहे. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरेलेल्या राजस्थानचा सुरुवातीला डगमगताना दिसला. कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि जॉस बटलर यांनी संयमी खेळी करत राजस्थानच्या संघाला विजय मिळवून दिला आहे.

या सामन्यात चेन्नईच्या संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीवीर फाफ डु प्लेसिस 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर शेन वॉटसनही 8 धावा करून माघारी परतला. दरम्यान, सॅम करनला चांगली सुरूवात मिळाली. परंतु,  22 धावांवर असताना तो देखील झेलबाद झाला. गेल्या सामन्यात चांगली कामगिरी करणारा रायडूलाही  मोठी धावसंख्या करता आली नाही. रायडू 13 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रविंद्र जाडेजा यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला शंभरी पार करून दिली. महेंद्र सिंह धोनी (28) 18व्या षटकात बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या केदार जाधव आणि रविंद्र जाडेजाने संघाला 125 धावापर्यंत घेऊन गेले. IPL 2020 Points Table Updated: CSK विरुद्ध विजयानंतर RR संघाचा आयपीएलच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप

 चेन्नईच्या संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानच्या संघाचीही सुरुवात खराब झाली. बेन स्टोक्स, रॉबिन उथप्पा आणि संजू सॅमसन स्वतात माघारी परतले. त्यानंतर मैदानात आलेल्या जॉस बटलर आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने संयमी खेळी करत संघाला विजय मिळवून दिली. खेळपट्टीचा अंदाज घेत सावध खेळ करून त्यांनी 78 चेंडूत नाबाद 98 धावांची भागीदारी केली.