
Punjab Kings vs Delhi Capitals IPL 2025 LIVE Streaming: पंजाब किंग्जने आधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. बारा सामन्यांमध्ये आठ विजयांचा प्रभावी विक्रम नोंदवला आहे. पंजाब किंग्ज पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. गेल्या सामन्यात त्यांनी राजस्थान रॉयल्सला पराभूत करून विजय मिळवला. पंजाब किंग्ज या सामन्यात विजय मिळवून टॉप-टूमध्ये स्थान मिळविण्यासाठी उत्सुक आहेत. पंजाबचा संघ 17 पॉइंटने टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स 13 पॉइंटने टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे.
पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आयपीएल 2025 सामना कधी खएळला जाईल?
शनिवारी, २४ मे रोजी सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल, टॉस भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता होणार आहे.
पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आयपीएल 2025 सामना कुठे होईल?
पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आयपीएल 2025 सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होईल.
पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आयपीएल 2025 सामना कोणत्या चॅनेलवर प्रसारित केला जाईल?
पीबीकेएस विरुद्ध डीसी आयपीएल 2025 सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल.
पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आयपीएल 2025 सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे उपलब्ध असेल?
पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आयपीएल 2025 सामना जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर थेट प्रक्षेपित केला जाईल.