PSL 2021: पाकिस्तान बोर्डाची कडक कारवाई, नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी Naseem Shah याची स्पर्धेतून हकालपट्टी
नसीम शाह (Photo Credit: Getty Images)

Naseem Shah Ruled out of PSL 2021: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी आणि इतर भागधारकांना हा स्पष्ट संदेश पाठविला की कोविड-19 प्रोटोकॉल (COVID-19 Protocols) उल्लंघनाबाबत त्यांच्याकडे शून्य-सहिष्णुता धोरण आहे आणि याचे उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं जेव्हा त्यांनी पाकिस्तान सुपर लीगच्या (Pakistan Super League) उर्वरित सामन्यांतून युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहला (Naseem Shah) हद्दपार केले. स्पर्धेच्या कोविड प्रोटोकॉलचा भंग केल्यामुळे शाहला पुढच्या महिन्यात अबु धाबी (Abu Dhabi) येथे होणाऱ्या स्पर्धेतून काढून टाकण्यात आले आहे. कोविड-19 ची जुनी नकारात्मक चाचणी घेऊन 18 वर्षीय वेगवान गोलंदाज सोमवारी लाहोर (Lahore) येथील टीम हॉटेलमध्ये दाखल झाला. पीसीबीच्या प्रोटोकॉलनुसार बुधवारी अबू धाबीला जाणाऱ्या सर्व खेळाडूंची टीम हॉटेलमध्ये येण्यापूर्वी 48 तासापेक्षा जास्त वेळ न घेतलेली नकारात्मक चाचणी सादर करण्यासाठी आवश्यकता आहे. तथापि शाहने सोमवारी 18 मे रोजी घेण्यात आलेल्या चाचणीचा अहवाल सादर केला. (PSL 2021 साठी UAE कडून पाकिस्तान बोर्डाला मिळाला ग्रीन सिग्नल, अबू धाबी येथे होणार उर्वरित सामन्यांचे आयोजन)

पीएसएलच्या स्वतंत्र वैद्यकीय सल्लागार समितीच्या सूचनेवर तीन सदस्यीय समितीने घेतलेल्या निर्णयानुसार हॉटेल सोडण्यापूर्वी त्यांनी शाहला तातडीने एका स्वतंत्र मजल्यावर क्वारंटाईन ठेवले, असे पीसीबीने म्हटले आहे. “पीसीबी आपल्या वेगवान गोलंदाजांना स्पर्धेतून काढण्यात काहीच अभिमान बाळगणार नाही, परंतु जर आम्ही या नियमांकडे दुर्लक्ष केले तर आम्ही संभाव्यतः संपूर्ण कार्यक्रम धोक्यात आणू,” पीसीबीचे संचालक व्यावसायिक बाबर हमीद यांनी एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, शाह पीएसएल फ्रँचायझी क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचा महत्त्वाचा खेळाडू मानला जायचा. नोव्हेंबर 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण करताना तो पहिल्यांदा चर्चेत आला आणि त्यानंतर गतवर्षी रावळपिंडी येथे बांग्लादेश विरोधात कसोटी सामन्यात हॅटट्रिक घेतली. शाहने नऊ कसोटी सामने खेळले आहेत आणि 20 विकेट्स घेतल्या आहेत.

दुसरीकडे, या आठवड्यात सहा फ्रँचायझीमधील खेळाडू अबू धाबीसाठी रवाना होणार आहेत, मात्र पीसीबीने अद्याप उर्वरित 20 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले नाही. पाकिस्तानची प्रमुख घरगुती टी-20 लीग मार्च महिन्यात 20 सामने झाल्यावर पुढे ढकलण्यात आली जेव्हा सहा फ्रॅंचायझीतील अनेक खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांची कोविड-19 चाचणी सकारात्मक आढळली.