PSL 2021: यंदा वर्षाच्या सुरुवातीला कोविड-19 महामारीमुळे (COVID-19 Pandemic) पाकिस्तान सुपर लीगचे (Pakistan Super League) सहावे सत्र स्थगित झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) स्पर्धेचे उर्वरित 21 सामने अबू धाबी (Abu Dhabi) येथे आयोजित केले जाणार असल्याची पुष्टी केली आहे. पीसीबीला (PCB) संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) सरकारकडून या स्पर्धेच्या संचालनासाठी मान्यता व सूट मिळाली आहे. पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान म्हणाले की, “अबू धाबी येथे उर्वरित पीएसएल (PSL) 6 सामन्यांच्या उर्वरित अडथळ्यांवर मात केली गेली आहे आणि सर्व यंत्रणा आता चांगली आहेत. युएई सरकार, राष्ट्रीय आपत्कालीन संकट आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अमीरात क्रिकेट बोर्ड आणि अबू धाबी क्रीडा परिषदेचे सर्व अंतिम अडथळे दूर झाल्याची खात्री करुन देण्यात आलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, ज्याने आम्हाला आमची स्पर्धा पूर्ण करण्याच्या स्थितीत ठेवले आहे.” (PSL 2021 दरम्यान अनेकदा झाले बायो बबलचे उल्लंघन, सुरक्षेमध्येही तडजोड; PCB च्या अहवालात मोठा खुलासा)
फ्रँचायझी मालकांशी सल्लामसलत केल्यानंतर सामन्यांची तारीख व तपशील नंतर जाहीर करण्यात येईल, असे पीसीबीने सांगितले. पाकिस्तान सुपर लीग दरम्यान खेळाडूंमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रकरण आढळल्यानंतर लीगला यंदा मार्चच्या मध्याच्या स्थगित केले होते. स्पर्धा पुढे ढकलण्यापूर्वी एकूण 14 सामने खेळले गेले होते. त्यानंतर पीसीबीने कराची येथे 1 ते 20 जून दरम्यान पीएसएल उर्वरित सामने आयोजित करण्याच्या विचारात होती. परंतु देशातील कोविड-19 स्थितीवर नजर ठेवणाऱ्या ‘नॅशनल कमांड अँड ऑपरेशन ऑथॉरिटी’च्या सल्ल्यानुसार अखेरीस स्पृहा युएईमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. क्वेटा ग्लेडीएटर्स आणि इस्लामाबाद युनायटेड यांच्यात झालेल्या स्पर्धेचा 15 वा सामना पाकिस्तानी अष्टपैलु फवाद अहमद कोविड-19 सकारात्मक आढळल्यानंतर पुढे ढकलला गेला होता.
BIG NEWS FOR FANS: PCB has secured all pending approvals from the UAE government, the remaining #HBLPSL6 matches are now good to go in Abu Dhabi! pic.twitter.com/ErPOkYrmKB
— Pakistan Cricket (@TheRealPCB) May 20, 2021
दरम्यान, दिल्ली आणि अहमदाबाद येथे बहुविध फ्रेंचायझींमध्ये कोविड-19 प्रकरणांमुळे 4 मे रोजी आयपीएल 2021 स्थगित करण्यात आले होते. अशास्थितीत, यंदा या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी बीसीसीआय योग्य विंडोच्या शोधात आहे.