T20 World Cup 2024: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2024) 15 सदस्यीय पाकिस्तान संघाची घोषणा केली आहे. बोर्डाने एकाही राखीव खेळाडूचे नाव जाहीर केलेले नाही. बाबर आझमकडे (Babar Azam) संघाची कमान सोपवण्यात आली आहे. 2 जूनपासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. पाकिस्तानचा संघ 6 जून रोजी यजमान अमेरिकेविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. यानंतर 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना रंगणार आहे. यावेळी अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत जेतेपदासाठी 20 संघ भिडणार आहेत. या संघांची प्रत्येकी 5 च्या 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत.
Pakistan confirm ICC Men's T20 World Cup 2024 squad
Read more ➡️ https://t.co/CuJbxi7M3X#WeHaveWeWill | #BackTheBoysInGreen
— PCB Media (@TheRealPCBMedia) May 24, 2024
विश्वचषक संघात प्रथमच 5 खेळाडूंचा समावेश
15 खेळाडूंपैकी अबरार अहमद, आझम खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, सैम अयुब आणि उस्मान खान यांची पहिल्या टी-20 विश्वचषकासाठी निवड करण्यात आली आहे. मोहम्मद अमीर आणि इमाद वसीम शेवटचे अनुक्रमे 2016 आणि 2021 स्पर्धेत दिसले. इतर 8 खेळाडूंनी 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला होता. 2009 मध्ये पाकिस्तानने पहिल्यांदा आणि शेवटचा टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.
टी-20 विश्वचषक 2024 साठी पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सईम अय्युब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.