T20 World Cup 2021: यूएईमध्ये (UAE) होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) आपला संघ जाहीर केला आहे. स्टार फलंदाज बाबर आझमला (Babar AzaM) संघाची कमान देण्यात आली आहे. तर वरिष्ठ खेळाडू शोएब मलिक (Shoaib Malik) आणि सरफराज अहमद (Sarfraz Ahmed) यांना संघातून वगळण्यात आले आहेत. तसेच फखर झमानला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने राखीव खेळाडूंमध्ये स्थान दिले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विश्वचषकासाठी आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे, तर तीन खेळाडूंना राखीव ठेवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने संघ निवडण्यासाठी 9 सप्टेंबरपर्यंत वेळ दिला आहे. मात्र, पीसीबीने (PCB) अंतिम मुदतीच्या तीन दिवशीपूर्वी संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या पाकिस्तान संघाचे हेच खेळाडू न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध आगामी टी-20 मालिका देखील खेळणार आहेत. (T20 World Cup 2021: पाकिस्तान कर्णधार बाबर आजमचा दावा, म्हणाला- ‘टीम इंडियावर आमच्यापेक्षा जास्त दबाव’, कारणही केले स्पष्ट)
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अत्यंत कठोर पाऊल उचलून माजी कर्णधार सरफराज अहमद आणि अष्टपैलू शोएब मलिक यांना संघातून बाहेर केले आहे. शोएब मलिकने अलीकडे खूप निराशाजनक कामगिरी केली आहे. तसेच वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या सीपीएलमध्येही मालिकेत देखील त्यांची बॅट पूर्णपणे शांत आहे. दुसरीकडे, 2019 विश्वचषकापासून सरफराज अहमद संघाचा अनियमित सदस्य बनला आहे. याशिवाय सरफराज अहमदला केंद्रीय कराराच्या यादीत क श्रेणीमध्येही टाकण्यात आले. मात्र, पीसीबीने युवा खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला आहे. PSL मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या आझम खानला संघात स्थान मिळाले आहे. इमाद वसीमने देखील टी-20 संघात स्थान मिळवले आहे. याशिवाय आसिफ अली आणि खुशदिल शाह यांनाही टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळाले आहे. टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 24 ऑक्टोबरला काट्याची टक्कर होणार आहे.
🇵🇰 Pakistan have named their squad for the ICC Men's @T20WorldCup 2021.
Details 👉 https://t.co/s3VPjFKbUc pic.twitter.com/hTCtmNaJ0F
— ICC (@ICC) September 6, 2021
टी 20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, आजम खान (यष्टीरक्षक), हसन अली, इमाद वसीम, खुशदील शाह, मोहम्मद हफीज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम, शाहीन शाह आफ्रिदी, सोहेब मकसूद.
राखीव: फखर जमान, शाहनवाज डहानी आणि उस्मान कादिर.